Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील श्री साई सेवक मंडळ (दातीवली)उद्या पालखीसह भव्य पदयात्री सोहळा…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यातील दातीवली येथील श्री साई सेवक मंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिर्डी येथे साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वात मोठी व भव्य दिव्य असा पालखी पद यात्रा सोहळा उद्या दातीवली ते श्री क्षेत्र शिर्डी येथे रवाना होणार आहे यंदाचे सोळावे वर्ष असून, यावर्षी मोठ्या प्रमाणात या पायी पालखी सोहळ्यात साईभक्तांनी सहभाग घेतला आहे .पालखीचे स्वागत दिव्यातील अनेक चौका चौकात करत दातीवली   येथून साईभक्तपालखी घेऊन पायी शिर्डी येथे प्रस्थान करतात. या दरम्यान ठिकठिकाणी साई पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत असते.साईभक्तांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते.

मंडळाचे अद्यक्ष नामदेव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष समीर पाटील व सर्व साई भक्त अथक परिश्रम घेत योग्य नियोजन करून पालखीला मार्गस्थ्य नेण्यात दरवर्षी मोलाची भूमिका पार पाडत आहेत. यंदाही साईनामाच्या गजरात दिव्यातून मोठ्या उत्सहात पालखी पद यात्रेसहित शिर्डी कडे मार्गक्रम करेल असे मंडळाचे अद्यक्ष नामदेव नाईक  यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे