बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवा आर पी एफ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी,हैद्राबाद येथून घरातून पळून आलेल्या अल्पयीन चार मुली व एक मुलगा पहाटे घेतले ताब्यात,चौकशीत महत्वाची बाब समोर…

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता 22 जुले : दिवा रेल्वे पोलिसांना फलाटावर गस्त घालत असताना फलाट क्रमांक ६ व ७ वर कॅन्टीन जवळ त्यांना अल्पवयीन एक मुलगा व चार मुली संशयास्पद बसलेले आढळले त्यातल्या दोन मुली रडत होत्या असे दिसून आले प्रसंगी रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना अभिनेत्री बनण्यासाठी पैसे कमवायचा उद्देशाने आम्ही हैद्राबाद मधून मुंबईत घरातून पळून आलो आणि सोबत असलेला मुलगा हा चेरापली जिल्ह्यातील असून तोदेखील त्यांच्या सोबत होता. अधिक चौकशी करत असताना गस्त घालणाऱ्या आर पी एफ पोलिसांना संशयास्पद काही तरी वाटल्याने त्यांनी दिवा आर पी एफ चौकीत त्यांना आणले असता नंतर चाईल्ड लाईन च्या सदस्य श्रद्धा नारकर व कामिनी शेलार याना बोलावून समक्ष मुलांची चौकशी करण्यात आली असता समजले की चारही मुली हैद्राबाद येथून घरातून पळून आल्या आहेत CWC ठाणे व आरपीएफ यांच्या कडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले व सदर मुलींच्या कुटुंबांना फोन द्वारे कळविण्यात आले त्यांनी दिवा आरपीएफ चे आभार मानत प्रशंसा केली.

प्रसंगी पूनम तेलगोटे, संध्या शर्मा हे आर पी एफ पोलिस व MSF भाऊ पाटील, भास्कर घुगे यांनी केलेल्या प्रशंसनीय कार्यांचे वरिष्ठांनी कौतुक करत आभार व्यक्त केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे