
गाडीचा नंबर जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी असा अनेकांचा गैरसमज असतो. आपल्या गाडीपेक्षा तिचा नंबर दुसऱ्यांचे लक्ष कसे वेधून घेईल, याकडेही बऱ्याच जणांचा कल असतो. त्यासाठी अधिकचे पैसे मोजण्यास तयार होतात. अलीकडच्या काळात ही क्रेझ वाढत असून हौसेला मोल नाही याची प्रचिती यानिमित्ताने आल्याशिवाय राहत नाही. दरम्यान, आता अशा पसंतीच्या व्हीआयपी नंबरसाठी आरटीओत हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे वाहनधारकांची होणारी धावपळ वाचणार आहे.