ठाकरे गटाची रणरागिणी योगिता नाईक यांच्या पाठवपुराव्याला यश.. सोसायटीयांची पालिका प्रशासनाकडून गणेशपाडा येथील खंडित जलवाहिणी पुन्हा जोडण्यात आली..
अमित जाधव - संपादक

दिवा -वॉर्ड क्र २८ दातिवली गणेशपाडा येथील श्री गणराज सोसायटी,सोनाईवाडी सोसायटी व गणेश कृपा सोसायटी* येथील रहिवाशांना पालिका प्रशासना कडून पुर्व सूचना न देता दातिवली येथील जुनी जलवाहिणी बंद करण्यात आल्याकारणांने त्या सोसायटीचा पाणीपुरवठा खंडित झाला होता, महिनाभरापासुन तेथील रहिवाशी पिण्याच्या पाण्यापासुन त्रासले होते,प्रशासनाकडून दुर्लक्षित झाल्याने तेथिल रहिवाशांनी शिवसेना(ठाकरे)पक्षाच्या विधानसभा संघटिका योगिताताई मोरे-नाईक यांची भेट घेऊन आपल्या पिण्याच्या पाण्याविषयी समस्या मांडल्या असता योगिता नाईक यांनी त्या समस्याची तातडीने दखल घेऊन दिवा प्रभाग समिती कार्यलय येथे जाऊन पाणीपुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व सतत पाठपुरावा चालुठाकरे ठेवला अखेर आज पाठपुराव्याला यश आले असुन त्या सोसायटीना पालिका प्रशासना कडून गणेशपाडा जलवाहिणीवरून नवीन कनेक्शन देण्यात आले,तेथील रहिवाशांनी योगिता नाईक व पालिका प्रशासनाने आभार मानले.त्यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी व तेथील रहिवासी उपस्थित होते.