लोकलच्या विकलंकांच्या डब्यात गर्दुल्याचा धुडकूस,लोकलमध्ये बसून खुले आम अमली पदार्थाचे सेवन ,महिलांकडे बघून अश्लील हावभाव महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर…
अमित जाधव - संपादक
महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरलोकलमधील विकलांगांच्या डब्यात बसून एक व्यक्ती सिगारेट ओढत खुलेआम अमली पदार्थ सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती महिलांकडे बघून अश्लील हावभाव करत असल्याचे देखील सांगितले जात आहे.
महिलांच्या डब्यातुन या व्यक्ती चा मोबाईल मध्ये व्हिडिओ करण्यात आला आहे.या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, आज सकाळी कर्जतला जाणाऱ्या लोकलच्या डब्यात हा प्रकार घडला आहे ,हा गर्दुला ठाणे रेल्वे स्थानकावरून कर्जतला जाणाऱ्या लोकलमध्ये चढला आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर उतरला, मात्र त्या दरम्यान तो लोकलमध्ये बसून तो खुलेआम सिगारेट तसेच अमली पदार्थ सेवन करत होता ,तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दारात उभे राहून या विकलांग डब्याला लागून असलेल्या महिलांच्या डब्याकडे पाहून अश्लील हाव भाव आणि हातवारे करत गोंधळ घातला, हा सर्व व्हिडिओ लोकलमधील प्रवाशांनी चित्रित केला आहे .



