Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंग

देसाई खाडीत सुटकेस मध्ये मिळालेल्या महिले चा मृतदेह अखेर आरोपीस २४ तासाच्या ठाणे पोलिसांनी  केल अटक….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
ठाणे -दिनांक २४/११/२०२५ रोजी दुपारी १२.५५ वा. नियंत्रण कक्ष, ठाणे येथुन प्राप्त झालेल्या संदेशानुसार देसाई गाव कडुन कल्याणकडे जाणारे रोडवर देसाई गावचे पुढील खाडी ब्रिजचे खाली एका बॅगेमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याबाबत माहिती मिळुन आली असता त्याप्रमाणे बिट मार्शल २ वरील अंमलदार यांनी खात्री करुन पोलीस ठाण्यात माहिती कळविली. त्याप्रमाणे लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांचेसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी भेट देवुन पाहणी केली असता तेथे खाडीचे पाण्यातील मातीचे भरावावर एक बॅग पडलेली दिसुन आली. त्यामध्ये एका २० ते २५ वर्षे वयाच्या महिलेचे प्रेत पाय गुडघ्यात दमडुन ट्रॉली बॅगमध्ये भरलेले व अर्धवट बाहेर आल्याचे दिसत होते. मयत महिलेचे अंगात नेसुस गुलाबी रंगाचा टॉप, त्यावर नक्षीदार फुलांची डिझाईन, त्याखाली लाल रंगाची लेगीन्स घातलेली होती. तिचे डावे हाताचे मनगटाजवळ P.V.S. असे इंग्रजीमध्ये गोंदलेले होते. तसेच प्रेत फुगलेले व अर्धवट कुजलेले होते. सदर मयत महिलेचे नातेवाईक किंवा परिचीत मिळून आलेले नाहीत. त्यावरुन दिनांक २४/११/२०२५ रोजी दुपारी १३.१५ वा. पुर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने अनोळखी महिलेस अज्ञात कारणावरुन कश्याने तरी जिवे ठार मारून प्रेत ट्रॉली बॅगमध्ये भरुन सदर ठिकाणी प्रेत ट्रॉलीबॅगसह पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने देसाई खाडी ब्रिजखाली फेकुन दिलेले असल्याबाबत शिळ डायघर पोलीस ठाण्यात गु. रजि.नं. ९५५/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३ (१), २३८ प्रमाणे अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम पौळ यांनी मयताची ओळख पटवून आरोपीचा शोध तपासकामी अधिनस्त अधिकारी / अंमलदार यांचे चार तपास पथके तयार करून गुन्हयाचा तपास चालू असताना सदर गुन्हयाच्या अनुषंगाने सोशल मिडीयावर प्रसारीत केलेल्या बातमीद्वारे एका साक्षीदाराकडून मा. अपर पोलीस आयुक्त श्री. विनायक देशमुख, सो. पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे यांना प्राप्त उपयुक्त माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीताबाबत सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या माध्यमातुन कसोशीने शोध घेवुन सदर गुन्हयात आरोपीत नामे विनोद श्रीनिवास विश्वकर्मा वय ५० वर्षे रा.ठि. देसाईगाव, ता.जि. ठाणे मुळगाव-गोरखपुर, उत्तरप्रदेश यास देसाई येथून ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता सदरचा गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयातील मयत महिला नामे प्रियांका विश्वकर्मा वय २२ वर्षे ही आरोपीसोबत मागील ०५ वर्षापासुन राहावयास होती. त्याच्यात दिनांक २१/११/२०२५ रोजी रात्रौ आपसात भांडण झाले होते. आरोपीत याने मयत महिलेचा गळा दाबुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने तिला ट्रॉली बॅगमध्ये भरुन ०१ दिवस रुममध्येच ठेवले होते. मयत महिलेच्या प्रेताची दुर्गंधी सुटल्यानंतर दिनांक २२/११/२०२५ रोजी रात्रौ ११.३० ते १२.०० वा. चे दरम्यान प्रेत असलेली ट्रॉलीबॅग रोडने पायी चालत खाडी पुलाकडे घेवुन जावुन सदरची ट्रॉलीबॅग पुलावरुन खाली फेकुन दिली होती. मयत व आरोपीताबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना सोशल मिडीयामध्ये प्रसारीत झालेल्या बातमीच्या आधारे साक्षीदार मिळवून, हददीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करुन सदर गुन्हयातील मयताची ओळख पटवून आरोपीस सदर गुन्हयात २४ तासात अटक करुन खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून स्तुत्य अशी कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी श्री. सुभाषचंद्र बुरसे पोलीस उप आयुक्त परि. १ ठाणे, श्री. प्रशांत कदम पोलीस उप आयुक्त परि. ५ वागळे इस्टेट, श्रीमती प्रिया डमाळे सहा. पोलीस आयुक्त कळवा विभाग, श्री. श्रीराम पौळ वपोनि शिळ-डायघर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजेंद्र राऊत, सपोनि / संतोष चव्हाण, सपोनि/अनिल राजपुत, सपोनि/योगश लामखडे, सपोनि/शहाजी शेळके, सपोनि/अमोल पोवार, पोउपनिरी/माने, पोउपनिरी/बेळगे, पोउपनिरी/तिडके, पोह/श्यामकुमार राठोड, पोह/हनुमंत मोरे, पोह/भरत जाधव, पोह/तेजस परब, पोह / विश्वास मोटे, पोह/महेंद्र लिंगाळे, पोह/सचिन कोळी, पोह / अजय साबळे, पोह / रमेश
1/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे