दिव्यातील पाच वर्षाच्या हरवलेल्या अल्पवयीन मुलीचे पालकच गायब, मुलीचे शारीरिक व शैक्षणिक नुकसान पाहताना मुंब्रा पोलिसांचे नागरीकांना आव्हाहन…..
अमित जाधव - संपादक
ठाणे – दिव्यात मुंब्रा पोलिस स्टेशन गुन्हा रजी न.172/23 भाद वी कलम 317 मधील मिळून आलेली मुलगी शिवानी पूर्ण नाव माहीत नाही वय अंदाजे 5 वर्ष ही दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी गणेश नगर तलाव दिवा पूर्व या ठिकाणी मिळून आली असता पोलिसांनी काही दिवस वाट पाहत मुलीचे कोणतेच नातेवाईक आले नाही त्यामुळे सदर मुलीस बाल कल्याण समिती उल्हासनगर येथे हजर केले व तिला शासकीय मुलींचे निरीक्षण गृह व विशेष बाल सुधार गृह येथे ठेवण्यात आलेले आहे.सदर मुलींचे पालकांचा शोध न लागल्याने बालकल्याण समिती यांचे आदेशाने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर मुलीचे पालक मिळून न आल्याने सदर मुलीचे नाव व पालकांचे नाव निष्पन्न न झाल्याने मुलीचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तरीही मूब्रा पोलिस स्टेशनच्या माध्यमातून नारिकांना आवाहन करण्यात येते की वरील फोटो मधील मुलगी हिला कोणी ओळखत असल्यास तिचे नातेवाईक याचे बाबत अधिक माहिती प्राप्त करून मुंब्रा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कींगरे किंवा पोलिस ह.लीलाधर सोलुंखे यांना 8975578100 खालील क्रमकावर संपर्क करावा.
माहिती मिळाल्यास संपर्क फोन नंबर
1) पोलीस नियंत्रण कक्ष ठाणे शहर फोन नं. ०२२-२५४४३६३६.
२) मुंब्रा पोलीस स्टेशन ठाणे शहर फोन नं. ०२२-२५४६८३१५.
३) मुंब्रा पो. स्टेशन ठाणे शहर ई मेल: cp.thane.mumbra@mahapolice.gov.in
४) पोलीस उप निरीक्षक / राजेंद्र रा. किंगरे, ८७६७२३१६६७ मुंबा पो. स्टे
आदी संपर्क क्रमांक मुंब्रा पोलिस स्टेशन च्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत.



