विक्रोळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व श्री कर्मयोगी सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने हमखास बक्षीस योजनेच्या निधीतून जम्बो कुलरचे वाटप –. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …
अमित जाधव-संपादक
विक्रोळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व श्री कर्मयोगी सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने हमखास बक्षीस योजनेच्या निधीतून जम्बो कुलरचे वाटप –. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद … —————————————- मुंबई( प्रतिनिधी ) विक्रोळी.विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. 118 चे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे उपशाखाध्यक्ष व श्री कर्मयोगी सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्ता साटले यांनी हमखास बक्षीस योजना राबविली होती. त्या निधीतून कन्नमवार नगर व टागोर नगर विक्रोळी पूर्व येथील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व तक्षशिल बुद्ध विहार येथे जम्बो वॉटर कुलर नुकत्याच झालेल्या कार्यक्रमा मध्ये नागरिकांसाठी समर्पित करण्यात आले.
त्यावेळी, महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचे डॉ. असादे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे डॉ. केणी व मनसेचे उपाध्यक्ष श्री विनोद शिंदे, विभाग अध्यक्ष श्री. विश्वजित ढोलम, सचिव श्री. विक्रम कदम, म. वि. अध्यक्षा श्रीम. प्रियांका शृंगारे, श्रीम. निशाताई शेट्टी, श्रीम. सुचिता माने, उ. वि. अध्यक्ष श्री. किसन गावकर, श्रीम. संगीता पैगंणकर, शाखाध्यक्ष श्री. जयंत दांडेकर, उ. वि. अध्यक्ष श्री. अजय मिरेकर, श्री. पृथ्वी येरूणकर, श्री. अरुण बालण, वार्ड क्रमांक 119 चे शाखाध्यक्ष . संतोष देसाई, . दिनेश धरणे, शाखाध्यक्षा श्रीम. मेघा हुले, जनहित कक्षाच्या सौ. प्रांजल जाधव , महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मनोहर जाधव व इतर पदाधिकारी ,मनसेचे सक्रीय कार्यकर्ते विजय गांगुर्डे कर्मयोगी सेवा संस्थेचे सरचिटणीस रोहित साटले तसेच गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे तक्षशिल बुद्ध विहाराचे अध्यक्ष सुनील निकाळे व ललित पवार आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सर्व उपस्थितांनी श्री. दत्ता साटले यांच्या ह्या उपक्रमाचे स्तुत्य स्वागत व अभिनंदन केले व दत्ता साटले यांनी भविष्यात असे जनहितार्थ उपक्रम राबविण्याचे आश्वासन देऊन पुढील कार्य करण्यास प्रोत्साहन केले. श्री कर्मयोगी सामाजिक सेवा संस्था व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंतर्गत वैद्यकीय उपक्रमासाठी हमखास भाग्यशाली बक्षीस योजना काढण्यात आली होती . सदर योजनेतून मिळणाऱ्या नफ्यातून हॉस्पिटलमध्ये व बुद्धविहारात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी जम्बो वॉटर कुलर मशीन उपलब्ध करून देण्या साठी कर्मयोगी सेवा संस्थेचे अध्यक्ष व मनसेचे उपशाखाध्यक्ष दत्ता साटले यांनी विशेष मेहनत घेतली असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून व विक्रोळी विधानसभा क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे .