बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीमहाराष्ट्र

अखिल भारतीय ओबीसी भटके, विमुक्त फेडरेशनच्या अध्यक्ष पदी माजी खासदार हरीभाऊ राठोड तर सरचिटणीस पदी डाॅ. पी. बी. कुंभार याची निवड….

अमित जाधव-संपादक

*अखिल भारतीय ओबीसी भटके, विमुक्त फेडरेशनच्या अध्यक्ष पदी माजी खासदार हरीभाऊ राठोड तर सरचिटणीस पदी डाॅ. पी. बी. कुंभार याची निवड*

मुंबई-गणेश हिरवे

पुणे- राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुरस्कृत अखिल भारतीय ओबीसी भटके, विमुक्त फेडरेशनची पहिली जनरल सभा दि.१३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता उद्यान प्रसाद कार्यालय, पुणे येथे संपन्न झाली. यावेळी कर्मवीर डॉ. प्रल्हाद वडगांवकर यांनी थोडक्यात फेडरेशन चे स्थापना, ध्येय, धोरणे सांगितले. उपस्थित सभेमध्ये सर्वानुमते अखिल भारतीय ओबीसी भटके, विमुक्त फेडरेशनचे अध्यक्षपदी माजी खासदार तथा मा. आमदार हरिभाऊ राठोड, तर राष्ट्रीय ओबीसीचे महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी चे अध्यक्ष डॉ. पी.बी. कुंभार सर यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
याचबरोबर उपाध्यक्षपदी अॅड. राजन दीक्षित, नंदकुमार गोसावी यांची सचिवपदी, तर राष्ट्रीय मुस्लिम ओबीसी चे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांची सल्लागार पदी तर महाराष्ट्र प्रदेश महीला ओबीसी भटके विमुक्त फेडरेशन अध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ. पुष्पा कनोजिया, तर उपाध्यक्ष पदी सौ. कीरण शिंदे यांची एकमतानी निवड करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसीचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर डॉ. प्रल्हाद वडगांवकर, ओबीसीचे राष्ट्रीय ओबीसीचे महासंघ, महाराष्ट्र प्रदेशचे जनलर सेक्रेटरी सुभाष मुळे, मुख्य उपाध्यक्ष संदिप लचके मंचावर उपस्थित होते.
यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष पद स्वीकारले नंतर हरिभाऊ राठोड म्हणाले की आपण कोणत्याही संस्था, संघटनेचे पक्षाचे काम करा. मात्र ओबीसीच्या या राष्ट्रीय फेडरेशनच्या शिखर संस्था म्हणून या ठिकाणी एकत्र आले पाहिजे तरच आपल्या ओबीसी चे प्रश्न शासनाकडून व केंद्राकडून सोडवण्यासाठी न्यायिक भूमिका पार पाडता येईल. ओबीसी चे आजही अनेक प्रश्न प्रलंबित सोडवण्यासाठी या फेडरेशन ची स्थापना केली आहे.
यावेळी डाॅ. पी. बी. कुंभार म्हणाले की, घटनेच्या कलम ३४०,३४१, ३४२ प्रमाणे सर्वाना समान न्याय मिळाला पाहिजे. ओबीसी जनगणना, स्वतंत्र आर्थिक बजेट, शैक्षणिक सवलती, ओबीसी आरक्षण असे अनेक प्रश्न प्रलंबित असेन सर्व ओबीसीनी एका छत्राखाली काम करण्यासाठी फेडरेशनची आज स्थापणा केल्याचं सांगितलं.
शब्बीर अन्सारी म्हणाले की कोणत्याही घटकांवर अन्याय होता कामा नये यासाठी मोठी लढाई करावी लागणार असून प्रथम सर्व घटकांची जात वार जनगणना झाली पाहिजे. हा प्रथम अजेंडा घेऊन सर्वजण काम करू या. तसेच ओबीसी आरक्षण वाचवू या, कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ नये असे विविध गोष्टी वर अनेक जणांनी मते मांडली. यावेळी एकच निर्धार करून लढा उभारत राज्यकर्ते बनू या असा संकल्प सर्वांनी केला. तसेच या फेडरेशन छताखाली सर्वांनी एकत्र काम करणार असल्याचे सर्वांनी जाहीर केले. यावेळी राष्ट्रीय ओबीसीचे महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे समन्वयक दिपक महामुनी, सचिव सुधाकर कुंभार, प्राचार्य डाॅ. राहुलकुमार हिगोले सर, मा. प्राचार्य व्यंकट वांगवड सर, निलेश बोंगाळे, सिद्धेश हिरवे, महादेव मेंघे, सुधीर पाषाणकर, अंकुश शिंदे, मुर्ती राठोड, महेश भाट, हनुमंत गायकवाड, शेखर बामणे, आकाश ढोक, रमेश कुलकर्णी, रणजित माळवदे तसेच समस्त ओ. बी. सी. महासंघ महाराष्ट्र प्रदेश परिवार मधील बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार सर्व समाजातील नियुक्त पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक उपाध्यक्ष ऍड राजन दीक्षित आणि सूत्रसंचालन सत्यशोधक रघुनाथ ढोक तर आभार प्रदर्शन प्रा.सुदाम धाडगे यांनी मांडले. शेवटी राष्ट्रीय गीताने सभेची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे