Breaking
ब्रेकिंग

दिव्यात रिक्षा चालक आले वठणीवर ; नियमानुसार प्रवासी वाहतूक,शिवशक्ती रिक्षा युनियन चा दणका..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे ता २१ जुलै : दिवा शहरातील शिवशक्ती रिक्षा युनियनने चालक मालक यांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नियमानुसार रिक्षा रांगेत उभ्या करून प्रवासी भरत आहेत त्यामुळे स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडीतुन दिवेकरांना दिलासा मिळाला आहे असे दिसून येत आहे. दिवा स्टेशन परिसरातील प्रवाशाना प्रवास करते वेळी वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता हा प्रश्न आज युनियन सोडवला आहे यापुढे रिक्षा चालक हे नियमानुसारच प्रवाशी वाहतूक करतील असे युनियनचे अध्यक्ष विनोद भगत यांनी बोलताना स्पष्ट केल आहे. यापुढे बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून युनियन ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांत हजारांहून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

सदर कारवाईमुळे बेशिस्त रिक्षाचालकांना वचक बसणार आहे आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री मिळणार आहे. प्रवाश्यांच्या होणाऱ्या वारंवार तक्रारीवर शिवशक्ती रिक्षा युनियनने लक्ष देऊन कारवाई करून वाहतूक विभागास कळविले असून प्रवाश्यांनी देखील सहकार्य करून नियमानुसार रिक्षा रांगेत पकडाव्यात असे रिक्षा युनियनचे प्रवीण बार्शीकर यांनी सांगितले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे