बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवा प्रभागाचे नवनियुक्त सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांचा प्रभागात पाहणी दौरा,गणेशउत्सव काळात दातीवली तलावाची होणार लवकरच डागडुजी…

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता ७ ऑगस्ट : दिवा प्रभाग समितीचे नवनियुक्त सहायक आयुक्त अक्षय गुडधे आपल्या कामाच्या पहिल्याच दिवशी पदभार स्विकारल्यावर एक्शन मोड मध्ये दिसून आले. प्रचंड विस्तार होत असलेल्या दिवा शहरातील नागरी समस्या व येऊ घातलेल्या गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी दिवा शहराचा दौरा केल्याचे पहावयास मिळाले.

नवनियुक्त सहायक आयुक्त अक्षय गुडधे दिव्यातील नागरी सुविधा, रस्ते, पाणी समश्या, स्वच्छता व घनकचराचा आढावा घेण्यासाठी दिवा प्रभाग समितीचे दीपक माने (कार्यकारी अभियंता), अविनाश वसावे (उप अभियंता), अदित्य डावखर (कनिष्ठ अभियंता), दीपक गुजराथी, सुरेश वाघीरे (उप अभियंता, पाणी विभाग) व डोंगर परदेशी (स्वच्छता निरीक्षक) यांच्यासह दिव्यातील दातीवली गणेश तलाव येथे उपस्थित होते. प्रसंगी शिवसेनेचे मा. उपमहापौर रमाकांत मढवी, मा. नगरसेवक दीपक जाधव, चरणदास म्हात्रे, निलेश पाटील, शशिकांत पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे