Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्रेकिंग : रत्नागिरीसह सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ब्रेकिंग : रत्नागिरीसह सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के.!*

रत्नागिरी, 24 ऑक्टो : रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. देवरुख संगमेश्वरच्या दरम्यान भूकंपाचे हादरे बसले आहे. या भूकंपाची तीव्रता 4.46 रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे.  तर साताऱ्यातील कोयना धरण परिसर सुद्धा भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी होती. देवरुख संगमेश्वरच्या दरम्यान आज संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी  भूकंपाचे धक्के जाणवले.  4.46 स्केलचा भूंकप होता.

तसेच साताऱ्यातील कोयना धरण परिसर सुद्धा भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी होती. सायंकाळी 5 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोयना धरणापासून वारणा खोरे येथे 12 कि.मी. अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदु
याआधीही मार्च महिन्यात संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, साडवली परिसराला भूकंपाचा सौम्य धक्के जाणवले होते. भूकंपाच्या धक्कामुळे परिसरात एकच घबराट पसरली होती. अनेकांच्या घरातील भांडी ठेवण्याचे रॅक हलण्याने भूकंपाची जाणीव झाली होती. तर काही जणा झोपेत असताना बेड हल्ल्याने भीतीने जागे झाले होते. पण, सौम्य धक्के असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान चार वेळा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. कोयनेपासून ४१.६ किलोमीटर अंतरावर खेडमधील खोपी, शिरगाव , सवेंनी, मोहाने, अस्तान, आंबवली, बिजघर, तिसंगी , एनवरे, ऐनवली, तळे , यांसारख्या ४७ गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्र बिंदू खेड रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील ईशान्य बाजूस चार किलोमीटर अंतरावर तर चौथा धक्का खेडमधील खोपी गावाच्या नैऋत्य बाजूस तीन किलोमीटर अंतरावर होता. सर्वात मोठा धक्का पहाटे ५ ;२९ वाजता बसला असून या धक्याची तीव्रता ३.८१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती तर इतर तीन धक्के २.६ , २.८, व २.३ एवढ्या रिस्टर स्केलचे होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे