Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्रेकिंग, पुण्यात तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या….

अमित जाधव -संपादक

0 2 0 9 7 4

⭕️ब्रेकिंग, पुण्यात तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या….

पुणे, 06 डिसेंबर : पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आज दुचाकीवरून अचानक आलेल्या मारेकऱ्यांनी तरुणावर एकूण सहा गोळ्या झाडल्या त्यामुळे सदर तरुण घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला पडला . सदर दुर्दैवी घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली असून पोलीस अधिकाऱ्यासह गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

अधिक माहितीनुसार समीर मनूर शेख असं हत्या झालेल्य तरुणाचं नाव आहे. हा हल्ला आज (सोमवार) दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर झाला आहे. अचानक दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी बेसावध असलेल्या समीरवर बेछूट गोळीबार केला आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, समीर हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आहे. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे