Breaking
ब्रेकिंग

रोटरी क्लब ऑफ ठाणे टायटन्स आणि रोटारॅक्ट क्लब ऑफ ठाणे टायटन् विविध कामाच लोकार्पण…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

रोटरी क्लब ऑफ ठाणे टायटन्स आणि रोटारॅक्ट क्लब ऑफ ठाणे टायटन्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, म्हाळुंगे, ता. भिवंडी, जि.ठाणे.येथे विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट, पेवर ब्लॉक आणि वॉटर स्टेशन बांधण्यात आले. सदरचे उद्घाटन मा. अपर महासंचालक बसवराज नलेगवे,रोटरी क्लब ऑफ ठाणे टायटन्सचे अध्यक्ष / सदस्य ठाणे महानगरपालिका मा.नंदकुमार कृ फुटाणे ,मा.अतिरिक्त संचालक काझी सुहैल अनीसअहमद – मा.अतिरिक्त संचालक पी. के. चौहान – मा.सहाय्यक संचालक राहुल सिंग – मा.राष्ट्रीय सीमा शुल्क लक्ष्यीकरण केंद्र, मा.डीजीएआरएमचे अधीक्षक राहुल सिंग यांच्या हस्ते करण्यात आले व केंद्र प्रमुख पुष्पा पाटील मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक अरुण देसळे यांच्या स्वाधीन करण्यात आले

प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे २५ लाख रुपये होती आणि हे काम भारत सरकारच्या राष्ट्रीय सीमा शुल्क लक्ष्यीकरण केंद्र, डीजीएआरएम, सीबीआयसी, मुंबई, भारत सरकारच्या सीएसआर फंडातून व रोटरी क्लब ऑफ ठाणे टायटन्स यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे.दीपक पंजाबी, मुंबई प्रायोजित संगणक व संगणक साहित्य पुस्तकांचे ही वाटप करण्यात आले.
क्लबतर्फे सर्व विद्यार्थ्यांना टूथ ब्रश, टूथ पेस्ट आणि साबणासह टॉयलेटरीजचे वाटप करण्यात आले.बसवराज नळेगावे यांनी उपस्थितांना संबोधित करून केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यात अशा प्रकारच्या आणखी प्रकल्पांना पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली, रोटरी क्लब ऑफ ठाणे टायटन्सचे अध्यक्ष श्री.नंदकुमार कृ फुटाणे यांच्या उपक्रमांचेही कौतुक केले.विजय केवलरामाणी यांनी सीएसआर सहकार्याबद्दल सीमा शुल्क विभागाचे आभार मानले आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल शाळा प्रशासन व कंत्राटदारांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास सरपंच मा.जयवंत भवर, रोटरी क्लब ऑफ ठाणे टायटन्सचे सचिव विजय नारायण केवलरामाणी, रोटॅरॅक्ट क्लब ऑफ ठाणे टायटन्सचे अध्यक्ष योगेश फुटाणे, प्रकल्प अध्यक्ष संदीप धोत्रे, भरत सचदेव, जी. जी. कृष्णन, नंदिता गांगुली, पूर्वा साळी, कमलेश त्रिवेदी, दीपक पंजाबी शिक्षक वर्ग आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे