दिवा भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सपना भगत यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश,अखेर दिव्यात महिला पोलिस दाखल..
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता ६ जुलै : भाजप दिवा शहर महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सपना रोशन भगत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलले आहे. जनसेवा हे एक मात्र ध्येय डोळ्यासमोर ठेवून सौ सपना रोशन भगत यांनी दिवा पोलिस स्टेशन मध्ये महिलांच्या समस्या जाणून घ्यायला तसेच महिला आपल्या काही समस्या पुरुष पोलिसांना सांगण्यास संकोच करतात त्यासाठी महिला पोलिस असाव्यात म्हणून स्वतः लक्ष्य घालून ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिनांक ४ जुलै २०२४ रोजी निवेदन दिले होते आणि त्याची दखल घेऊन ठाणे पोलिस आयुक्तांनी तातडीने अंमलबजावणी करुन दोन अतिरिक्त महिला पोलिस कर्मचाऱ्यांची दिवा पोलिस चौकीला नियुक्ती केली आहे या बद्दल सौ. सपना रोशन भगत यांनी ठाणे पोलिस आयुक्तांचे आभार मानले आहे.
प्रसंगी सौ. सपना रोशन भगत यांनी स्वतः आज दिवा पोलिस चौकीला भेट देऊन रुजू झालेल्या महिला पोलिसांना शुभेच्छा देऊन दिवा पोलिस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक श्री अमोल कोळेकर यांचेही आभार मानले.



