Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

भाजपच्या ज्योती राजकांत पाटील आक्रमक ,यांचा 20 एप्रिल रोजी ठाणे महापालिकेवर पाणी हक्क मोर्चा…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

20 एप्रिल भाजपच्या ज्योती पाटील यांचा पालिकेवर पाणी हक्क मोर्चा

पाणी समस्ये विरोधात दिव्यातील महिला देणार ठाणे महापालिकेवर धडक

दिवा:-शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. मागील पाच वर्षात येथील पाणी टंचाईवर सत्ताधारी व प्रशासन ठोस उपाययोजना करू शकले नाही.ज्या पद्धतीने ठाणे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळते,त्याच पद्धतीने दिवा शहरातील नागरिकांना किमान पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या दिवा महिला मंडळ अध्यक्षा सौ ज्योती पाटील असंख्य महिलांसह ठाणे महापालिकेवर पाणी हक्क मोर्चा काढणार आहेत.

याबाबतचे निवेदन ज्योती पाटील यांनी ठाणे महापालिका आयुक्त,पोलीस प्रशासन यांना दिले असून या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,पाणीप्रश्न सुटेल असे दर पाच वर्षांनी येथील सत्ताधारी सांगत होते, मात्र प्रत्यक्षात दिवा शहराचा आपण दौरा केला तर येथील नागरिकांना गरजेपुरते सुद्धा पाणी मिळत नाही हे आपल्या लक्षात येईल.अनेक भागात दोन ते तीन दिवसानी चार-पाच हंडे पाणी मिळते.लोकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते,येथील नागरिक हे सामान्य कुटुंबातील आहेत.अनेकांची आर्थिक स्थिती बेताची आहे,अशा स्थितीत महिन्याला टँकर साठी लोकांनी 2 ते 3 हजार रुपये कुठून आणायचे? जी लोकं टँकरने पाणी विकत घेऊ शकतात ती लोकं पालिकेचे बिल भरू शकणार नाहीत का?येथील जनतेला पाणी द्यायचे नाही हाच सत्ताधारी लोकांचा उद्देश दिसतो असे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे.या गंभीर पाणी टंचाई कडे लक्ष वेधण्यासाठी आणि दिव्याच्या नागरिकांना ठाण्यातील नागरिकांप्रमाणे मुबलक पाणी दररोज मिळावं या मागणीसाठी दिव्यातील महिलांच्या सहकार्याने दि 20 एप्रिल रोजी दिवा शहर मंडळ महिला मोर्चाच्या वतीने तमाम माता भगिनी ठाणे महापालिका मुख्यालय येथे धडक मोर्चा काढणार आहेत असा इशारा सौ.ज्योती पाटील यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे