कॅम्ब्रिज इंग्लिश हायस्कूल ने विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्यासाठी यशस्वीपूर्ण लसीकरण मोहीम संपन्न…
अमित जाधव - संपादक

कॅम्ब्रिज इंग्लिश हाय स्कूलमध्ये 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना टिटॅनस (T.T.) आणि डिप्थेरिया लसी दिल्या गेल्या. या तीन दिवसीय मोहिमेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांचे सुरक्षितपणे लसीकरण करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे प्राचार्य, संयुक्त सचिव श्री दीपक राकेश चौहान, अध्यक्ष श्री शांतोष राजेश पांडे, शाळेच्या पर्यवेक्षिका मौसमी कनोजिया आणि शिक्षकगण मांसी टीचर, श्रद्धा टीचर, सुभम सर, राहुल जोगदंड सर, सोनी मांडलिक, आशा टीचर, जानवी टीचर, ज्योती टीचर आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते. सर्वांनी या मोहिमेच्या यशस्वितेत मोलाचे योगदान दिले.
या लसीकरण मोहिमेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना गंभीर आजारांपासून सुरक्षित ठेवणे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ बनवणे होता. शाळेच्या प्रशासन आणि आरोग्य पथकाच्या सक्रिय सहभागामुळे ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली.ही मोहीम विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे शाळेच्या संचालकांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.