Breaking
ब्रेकिंग

दिव्यात अनधिकृत अती धोकादायक इमारत केली जमीनदोस्त, कारवाई भीतीपोटी अनेक अनधिकृत बांधकाम बंद..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

ठाणे, दिवा ता २४ मे : दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने लोकसभा निवडणूकिचे मतदान पार पडल्यानंतर आज पुन्हा दिव्यात अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उभारला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांनी केली आहे.

दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांच्या नेतृत्वाखाली आज अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज दिनांक २४ मे २०२४ रोजी दिवा प्रभाग समिति प्रभाग क्रमांक क्रमांक २८ मधील दिवा-आगसन रोड वरील एस एम जी शाळेसमोरील धोकादायक असलेली तळमजला सह चार मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली. तसेच प्रभाग २८ मधील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या बांधकाम प्लिंथ वर श्री. अक्षय गुडधे, सहाय्यक आयक्त सो. दिवा प्रभाग समिति यांचे मार्गदर्शनखाली यंत्रसामुग्री ( पोकलेन ) च्या सहायाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करुन बांधकाम थांबविण्यात आले.

प्रसंगी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांनी यापुढेही अनधिकृत बांधकामावर कारवाई होत राहणार आहे असे बोलताना स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे