Breaking
ब्रेकिंग

दिवा शहर साबे गाव निराधारांना मिळाला हक्काचा आश्रम..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 6 3

ठाणे,दिवा ता ३१ ऑगस्ट : अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात. अशाच निराधारांना आधार देण हीच ईश्वर सेवा समजून गेल्या कित्येक वर्षांपासून सौ विद्या खापरे या अनाथांची अविरत सेवा करत आहे. दिवा शहरातील साबे गाव परिसरात त्यांनी लक्ष्मी वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून ते अनाथ,बेघर ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत आहेत.

सध्या त्यांच्या या वृध्दाश्रमात १० आजी -आजोबा आहेत. कोणाला मुल नाही, कोणी बेघर आहे. कोणाला त्यांची मुल संभाळत नाहीत तसेच काही च्या नातेवाईकांनी देखील स्वतःहून निराधारांना आश्रमात आणले आहे अशा सर्व वृद्धांची ते आपल्या या वृद्धाश्रमात काळजी घेतात. सदर वृद्धाश्रमात सौ खापरेताई त्यांच्या या सेवाकार्यात रवी खापरे , एस एस साळवे,चंद्रकांत सावंत व शरद थावडे यांचाही मोलाचा सहभाग आहे हे दिवस रात्र वृध्दाश्रमात निराधारांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून अनेक निराधारांना आश्रमात त्यांचे आप्तेष्ट किंवा नातेवाईक सोडून जातात त्यांना आम्ही औषधे ,मेडिकल चेकअप, सकस आहार तसेच फिरण्याजोगे मोकळे वातावरण उपलब्ध करून देत असतो. दिवा पूर्व येथे साबेगावातील हंसा इमारतीत तळ मजल्यावर प्रतिष्ठ जागेत आश्रम सुरु आहे तसेच आश्रमात अनेक उपक्रम देखील राबविले जातात असे आश्रमाच्या संचालिका सौ विद्या खापरे (संपर्क – 8591350433) यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे