बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मुलींना आमिष दाखवून ऑनलाईन सेक्स चॅटिंग करणाऱ्या आरोपीस अटक व १७ मुलींची सुटका ,गुन्हे प्रकटीकरण शाखा ११ ची धडाकेदार कामगिरी…

अमित जाधव-संपादक

मुलींना आमिष दाखवून ऑनलाईन सेक्स चॅटिंग करणाऱ्या आरोपीस अटक व १७ मुलींची सुटका

गुन्हे प्रकटीकरण शाखा ११ ची धडाकेदार कामगिरी

मुंबई संजय बोर्डे

मुंबई शहरामध्ये बऱ्याच ऑनलाईन चॅटिंग एप्लीकेशन द्वारे स्त्रियांना अश्लील सेक्स चॅटिंग तसेच अश्लील व्हिडिओ सेक्स चॅटिंग करण्यास प्रवर्तन करणारा कॉल सेंटरचा शोध घेऊन सदरचे कॉल सेंटर चालवणाऱ्यास गुन्हे प्रकटीकरण शाखा ११ यांनी कारवाई करून आरोपीस अटक करण्यात आली. यावेळी सदर कॉल सेंटर मधील १२मुली व काम करणाऱ्या पाच मुली अशा १७ मुलींची सुटका करण्यात आली. तसेच त्यांच्या जवळून १९ मोबाईल व लॅपटॉप व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

सदरची माहिती अशी की दिनांक २९ ऑगस्ट रोजी पक्ष कार्यालय ११ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना गोपनीय माहिती द्वारे माहिती मिळाली सिलिक मीडिया अँड एंटरटेनमेंट ७ माळा ७२१ व ७२२ जसवंती एलाईड बिजनेस सेंटर रामचंद्र लेन एक्सस्टेशन काचपाडा मालाड पश्चिम मुंबई या ठिकाणी चामेट नावाच्या ऑनलाईन चॅटिंग अँप्लिकेशन द्वारे रजिस्ट्रेशन केलेल्या भारतीय नागरिकांना तसेच इतर देशातील नागरिकांना फ्री मध्ये चॅटिंग आहे असे दाखवून त्यांनी रजिस्टर केले की त्यांना सदरचे एप्लीकेशन ओपन केल्यास त्यांच्याशी मुली अश्लील संभाषण करण्यात येते तसेच त्यांच्याकडून डिजिटल डायमंडच्या स्वरूपात पैसे स्वीकारून त्यांनी समोरील चॅट करणाऱ्या मुलींना डिजिटल डायमंड दिल्यास सदर मुली ह्या ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर त्यांचे कपडे काढून अशील हावभाव तसेच अश्लील कृत्य करीत असतात. सदर ठिकाणी वरिष्ठच्या आदेशाने पोलीस पथक तसेच कॉम्पुटर तज्ञ यांच्या मदतीने छापा कारवाई करण्यात आली. सदर छापा कारवाईदरम्यान ताब्यात घेतले आहे विचारपूस केली असता त्या ठिकाणी चामेट नावाच्या ऑनलाईन चॅटिंग एप्लीकेशन द्वारे रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना फ्री मध्ये चॅटिंग आहे असे दाखवून त्यांनी रजिस्टर केले आहे त्यांनी एप्लीकेशन ओपन केल्यावर त्यांच्याशी त्यांच्या ऑफिस मधील मुलीकडून अश्लील संभाषण करून तसेच ग्राहकाकडून डिजिटल डायमंडच्या स्वरूपात पैसे स्वीकारत समोरील चॅट करणाऱ्या ग्राहकांनी मुलींना आधी ऑनलाईन व्हिडिओ द्वारे कॉलवर कपडे काढून चॅट करत होत्या. सदर ठिकाणी छापा मारल्यास १२मुली तसेच ऑफिसमध्ये काम करणारे ५ मुली अशा १७ मुली मिळून आल्या आहेत सदर व्यक्ती मागील आठ महिन्यापासून चॅट करीत असल्याबाबत माहीत झाले . सदर ठिकाणी एक पुरुष व्यक्ती वय २५ वर्ष रा .ठी. रूम नंबर ५ सलीम खान चाळ नंबर दोन घरटनपाडा दहिसर पूर्व मुंबई यास अटक करुन त्याच्यावर

गु प्र .शा._ गु . अ.वी._ गु नो क्रं ,१३५/(मालाड पोलीस ठाणे गु नो क्रं ११५४/२०२२) कलम २९४ भा द वि सह कलम ६७(अ) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ सह कलम ६७ आ माहिती तंत्रज्ञान कायदा २००९ गुन्हा नोंविण्यात आला आहे
सदर कार्यामध्ये वरिष्ठ पोलीस पोलीस सह आयुक्त गुन्हे शाखा सुहास वारके, अप्पर पोलीस आयुक्त एस4 वीरेश प्रभू , पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रकटीकरण उत्तर काशिनाथ चव्हाण ,प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन गवस पोलीस निरीक्षक भरत गोणे साहेब पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, महिला सहापो निरीक्षक पूनम काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, अमलदार रामचंद्र शिंदे, चंद्रशेखर गायकवाड ,सुधीर तरटे ,सचिन खताचे प्रवीण सावंत सोनाली लाडे रंजीता सावंत सारिका कदम ,जयश्री गोसावी चालक उपेंद्र मोरे तसेच कक्ष १३कडील सपोनी रासकर व पोउनि खानविलकर व पथक कक्ष ९कडील मपोउनि पाटील व पथक कक्ष ६कडील मस पो नि देशमुख व पथक तसेच कक्ष १०व८v८ सात व आठ कडील अंमलदार यांनी जबाबदारी पार पाडली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे