दिव्यात सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी डॉक्टर वर गुन्हा दाखल ,सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखवणे किंवा चिथावणी देणारी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणा-यास कडक कारवाई केली जाईल – वपोनि निवृत्ती कोल्हटकर, मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे.
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता २६ जानेवारी : सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखवणे तसेच चिथावणी देणारी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणा-या इसमांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरणी दोन्हीही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
‘९ ग्रुप दिवा King’ या व्हॉट्सअप ग्रुपवर दि. २२/०१/२०२३ रोजी डॉ. पप्पु कुमार बोडेराम गौतम या सदस्याने प्रभु श्रीराम यांचे संदर्भातील आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करून हिंदु धर्मियांच्या धार्मिक श्रध्दांचा बुध्दीपुरस्पर व दुष्ट उद्देशाने कृती करून अपमान केला म्हणुन मुंब्रा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३००/२०२४, भादवि कलम २९५ (अ) १५३ (अ) प्रमाणे दि.२३/०१/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयातील आरोपी डॉ. पप्पु कुमार बोडेराम गौतम, वय ४३ वर्ष, राह. मुंब्रादेवी कॉलनी, दिवा, ठाणे यांस अटक केली असुन आरोपी सध्या मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे न्यायालयीन कोठडीत आहे.
तसेच मुंब्रा, संजयनगर परिसरातील इसम नामे असद जाकीर हुसेन रईन याने देखील त्याचे मोबाईल फोनमधील इन्स्ट्राग्राम अकाऊंन्ट बाबरी मस्जिद बाबत आक्षेपार्ह इन्स्ट्राग्राम स्टोरी बुध्दीपुरस्पर समाज माध्यमांवर प्रसारीत करून मुस्लीम धर्मियांमध्ये धार्मिक तेढ वाढविण्यास चिथावणी देणारा मजकुर प्रसारीत केला म्हणुन मुंब्रा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२८/२०२४, भादवि कलम २९५(अ), १५३ (अ) प्रमाणे दि.२४/०१/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयातील आरोपी असद जाकीर हुसेन रईन, वय ४३ वर्ष, राह. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे यांस अटक अटक केली असुन आरोपी सध्या मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे न्यायालयीन कोठडीत आहे.
सदरची कारवाई मा.डॉ. महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, प.प्रा. वि. ठाणे, मा.श्री. गणेश गावडे, परिमंडळ-१, ठाणे, मा. श्री. विजयसिंग भोसले, सहा. पोलीस आयुक्त, कळवा विभाग ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती कोल्हटकर सपोनिरी शहाजी शेळके व अमोल कोळेकर, सपोनिरी उमेश कोरडे, पोउपनिरी विजय सानप व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
मुंब्रा पोलीस स्टेशन वतीने सर्व धर्माच्या नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भविष्यात कोणत्याही जाती धर्म, धार्मिक पवित्र ग्रंथ, देवी देवता तसेच महापुरुषांबाबत कोणीही आक्षेपार्ह मजकुर व्हॉट्सअप, इन्स्ट्राग्राम, फेसबुक, टिब्टर व इतर सोशल मिडीया साईडवर प्रसारीत (व्हायरल) करू नये. आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणारे व त्यास समर्थन देणा-या इसमांविरूध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.