बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

*न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे येथे 21 जून जागतिक योग दिवस साजरा….

अमित जाधव-संपादक

न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे येथे 21 जून जागतिक योग दिवस साजरा.

जागतिक योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रातील 177 सभासदांव्दारे 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली. आणि 21 जून 2015 साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वर्षी *मानवते साठी योग’* या संकल्पनेवर आधारीत आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. आज दि. 21/06/2022 मंगळवार रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे येथे इयत्ता 11 वी व 12 वी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.प्रा.किरण चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून ला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपारीक अशी दोन्ही कारणे आहेत तसेच हा दिवस 21 जूनलाच का साजरा केला जातो त्या बद्दल माहिती सांगून योगाभ्यासाचे महत्व सांगितले. प्रा. सचिन कचरे व प्रा. मनस्वी नलावडे या दोन योग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले आणि विद्यार्थ्यांकडून प्रत्येक आसनांचे प्रात्यक्षिक करून प्रत्येक योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्या बद्दल माहिती उपलब्ध करून दिली, या वेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला होता. योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार असून या योग दिनाच्या दिवशी प्रा. विश्वास भोईर, प्रा. राहुल सोनफुले, प्रा.विनोद वाघमारे यांनीही प्रात्यक्षिक करून सहभाग नोंदवला. आजार टाळण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठी निरोगीपणावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने योगासने हा आपल्या जीवनाचा भाग बनवला पाहिजे असा संदेश आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी एस तुरूकमाने सरांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे