दिव्यात भारतीय जनता पार्टी च्या वतीने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी शिबीर उत्साहात पार,सपना रोशन भगत यांच्या सहकार्याने शेकडो नागरिकांनी घेतला लाभ…
अमित जाधव - संपादक
⭕️दिव्यात भारतीय जनता पार्टी च्या वतीने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी शिबीर उत्साहात पार…
सपना रोशन भगत यांच्या सहकार्याने शेकडो लोकांनी घेतला लाभ…
ठाणे, दिवा ता 30 डिसें :दिव्यातील मुब्रादेवी कॉलनी विभागात भारतीय जनता पार्टी आयोजित सपना रोशन भगत यांच्या सहकार्याने प्रभागात पंतप्रधान पाथविक्रेता आत्मनिर्भर निधी तीन दिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. पथविक्रेत्यांसाठी विशेष पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात करण्यात येत आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झालेला होता. शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करता यावा यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत पथविक्रेत्यांना बँकेकडून रु.10 हजार रक्कमेचे खेळते भांडवली कर्ज देण्यात येत आहे.यामध्ये पथविक्रेत्यांनी प्रथम टप्प्यात रु.10 हजार कर्ज रक्कमेची नियमित परतफेड केल्यास व्दितीय टप्प्यात रु.20 हजार भांडवली कर्ज देण्यात येते आणि रु 20 हजार कर्जाची नियमित परतफेड केल्यास तृतीय टप्प्यात रु.50 हजार इतके कर्ज देण्यात येते. अशाप्रकारे पथविक्रेत्याची बॅकेमध्ये पत वाढल्यास त्यास बँकेव्दारे अधिक पतपुरवठा करण्यात येतो. त्या सोबतच केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या भविष्य निधीवर आधारित हयात असेतोपर्यंत 08 प्रकारच्या विविध योजनांचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.याशिवाय आधार कार्ड, मतदान कार्ड व जनधन खाते उघडणे याचा समावेश शिबीरात करण्यात आला होता प्रसंगी ऐक हजाराहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. सदर शिबिरास विजय भोईर, समीर चव्हाण, पंकज सिहं, शिलाजीत तिवारी,राहुल साहू, सुदेश पाटील, अशोक गुप्ता, विजय वाघ यांची उपस्थिती लाभली असे रोशन भगत यांनी सांगितले.