ठाणे नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार) v व अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्प इंग्लिश स्कुल ठाणे येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करुन ‘फिट इंडिया फ्रीडम रन २०२१’ चे आयोजन……
अमित जाधव-संपादक
ठाणे नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार) v व अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्प इंग्लिश स्कुल ठाणे येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करुन ‘फिट इंडिया फ्रीडम रन २०२१’ चे आयोजन करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने संपूर्ण भारतभर अमृत महोत्सवी वर्ष वेगवेगळे कार्यक्रम करुन साजरे केले जात आहे. नेहरू युवा केंद्राद्वारे १३ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर पर्यंत ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ चे आयोजन केले आहे. आज दि. ३०/०९/२०२१ रोजी ठाणे जिल्ह्यातील विविध शाळातील ५० शालेय विद्यार्थ्यांच्या व युवक युवतींच्या सहभागाने ही ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ ठाण्यातील संकल्प इंग्लिश स्कुल येथे यशस्वीरित्या पार पडली. दुपारी २ ते ३ च्या दरम्यान घेण्यात आलेल्या या रनमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नेहरू युवा केंद्रातर्फे श्री. बाळा साठे सर तसेच अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतीक अकादमीच्या संस्थापिका साक्षी परब यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांचे मनोगत व्यक्त करताना ‘आलस्यम् ही मनुषस्य महत्तम रिपुः।’ या उक्ति प्रमाणे आळस झटकून रोज किमान अर्धा तास व्यायाम करण्याचा संदेश दिला. यानंतर साक्षी परब यांनी सर्व युवकांना फिट इंडिया फ्रीडम रन ची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित वर्तक नगर पोलीसस्टेशनच्या उपनिरीक्षक सोनी शेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शारिरीक फिटनेस चे महत्त्व पटवून दिले व त्याच बरोबर व्यसनांपासून दूर रहा, मोबाईल हाताळताना काळजी घ्या असे सांगितले. तसेच मुलींना उद्देशून ‘घाबरुन न जगता सुरक्षित व सावधानतेने जगा’ हा मोलाचा संदेश दिला.
त्यानंतर हातात भारतीय तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांची फिटनेस रन झाली. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांकडून स्वावलंबी समाज निर्मितीची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी संकल्प इंग्लिश स्कुलचे संस्थापक डॉ. राज परब, मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब, स्थानिक नगरसेवक श्री. दिलीप बारटक्के, विभाग संघटक सौ. राजश्रीताई दिलीप बारटक्के, समाजसेवक श्री. माणिक पाटील व ज्ञानदीप विद्यामंदिर मुंबा चे सहशिक्षक श्री. हेमंत नेहते व इतर मान्यवर उपस्थित होते. या उपस्थितांपैकी मथुराई संतोष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश माळी यांनी त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचलनाने या कार्यक्रमास चार चाँद लावले. या कार्यक्रमास संकल्प इंग्लिश स्कुलच्या शिक्षक वृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले.
‘फिट इंडिया रन’ झाल्यावर विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांमार्फत सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यानंतर ‘वंदे मातरम्’ ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.