गरबा किंग मा.नगरसेवक शैलेश पाटील यांचं दिव्यात चार ठिकाणी भव्य दिव्य रास गरब्याच आयोजन…..
अमित जाधव - संपादक
ठाणे/दिवा शारदीय नवरात्रोत्सवाची दिवा शहरात तयारी सुरू असून नवरंगात न्हाऊन निघण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत.ठाणे जिल्ह्यात यंदा हजारो मूर्तीची स्थापना होणार असून दिव्यात देखील अनेक सार्वजनिक मंडळाचे व कार्यकर्त्यांची मंडप सजावट, साउंड सिस्टिम, स्टेज उभारण्याचे नियोजन पूर्ण झाले आहेत. विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि डीजेच्या आवाजात गरबा नृत्य करण्यास तरुणाई सज्ज होत आहे तसेच शिवसेना चे गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिवा शहरात सल्लग चार ते पाच ठिकाणी रास दांडियाचे भव्य आयोजन केले आहे साबे येथील डिजे कंपाऊंड,तर पश्चिमेस क्रिश कॉलनी,दिवा अगसंन रोड येथील सदगुरू नगर आणि एन आर नगर या ठिकाणी भव्य दिव्य रास गरब्याचे आयोजन केले आहे तसेच उत्कृष्ट बक्षिसे व भेट वस्तू देखील यंदा ठेवण्यात आल्या आहेत
यंदा महिला वर्गामध्ये बक्षिसांची लयलूट करण्यासाठी व नृत्य करताना सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळून राहाव्यात यासाठी ड्रेस, हेअर स्टाईल, दागिने, टॅट्यू काढण्याला विशेष पसंती दिली जात आहे
मुंबईसह राज्यभरात नवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे.
मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत व या नियमांचे तंतोतंत पालन करून दिव्यातील यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव मोठया उत्साहात प्रारंभ होईल असे मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.