ठाणे – दिवा शहरात आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आजवर ज्यांनी कार्य केले असे दिनेश पाटील यंदाच्या निवडणुकीत आपल नशीब आजमवण्याचे तयारीत आहे.रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्यकारणी ला दिनेश पाटील यांनी आपला इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.त्याच बरोबर आंबेडकरी चळवळीतील युवा चेहरा असलेले सौरव आढांगळे यांनी पण इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. दिनेश पाटील हे गेली 15 वर्ष आंबेडकरी चळवळीत काम करत आले आहेत दिवंगत एकनाथ भगत यांचे नेतृत्वाखाली त्यांनी बराच जनसंपर्क वाढविला.त्याच बरोबर आंबेडकरी चळवळीला युवा चेहरा सौरव आढांगळे यांचे रुपाने दिव्यात लाभला कमी वेळात चांगली प्रसिद्धी मिळवली म्हणून या दोघांना उमदेवारी मिळाली तर नक्कीच ग्राऊंडवर याचे परिणाम जाणवतील.
पक्षाने संधी दिल्यास नक्कीच निवडणूक लढवू असे मत दिनेश पाटील यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर सौरव आढांगळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पक्षाने प्रामाणिक कार्यकर्ते यांना संधी द्यावी अन्यथा कार्यकर्ता नाराज झाला तर निवडणुकीत वेगळी भूमिका सुद्धा घेऊ शकतो.


