0
2
0
9
7
4
ठाणे, दिवा ता १ सप्टेंबर :दिव्यात दुचाकी-क्रेन धडकेत ऐकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या क्रेन व दुचाकी धडकेत दिवा-शीळ रस्त्यानवर नॅशनल शाळेजवळ मोटर सायकलस्वाराला डोक्याला गंभीर दुखापत होऊन एकाचा रूग्णालयात दाखल करण्यात पूर्वीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रसंगी जखमीला ताबडतोब मेट्रो हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते परंतु परिस्थिती नाजूक असल्याने तात्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव अद्याप पर्यंत समजले नसून क्रेन चालक फरार झाला असता पोलिसांनी अथक प्रयत्नांनी तत्काळ पकडुन अटक केली प्रकरणी दिवा (मुंब्रा) पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे अधिक तपास दिवा पोलीस करत आहेत.
0
2
0
9
7
4



