Breaking
ब्रेकिंग

सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रशांत मोटे यांच्या माहितीने कापूरबावडी पोलिसांना बालविवाह रोखण्यात यश,सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रशांत मोटे यांना कापूरबावडी पोलिसांची कौतुकाची थाप…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे: सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेले पत्रकार प्रशांत मोटे यांना काही सूत्रांकडून माहिती मिळाली की बाळकुम दादलानी न्यू महालक्ष्मी नगर परिसरात एका १४ वर्षीय मुलीचा बालविवाह एका ४५ वर्षाच्या राजस्थानी पुरुषाशी होत आहे अशी माहिती मिळताच पत्रकार प्रशांत मोटे यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत माहितीची शहानिशा करून कापूरबावडी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री उत्तम सोनावणे यांना संपूर्ण माहिती दिली,माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक प्रशासन डॉ श्री संजय निंबाळकर व त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब कोल्हापुरे,पोलिस उपनिरीक्षक अशोक शेळके,पोलिस काँस्टेबल राहुल भोसले,पोलिस हवालदार सीताराम बुधर,महिला पोलिस हवालदार उषा कोळी यांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत पुरुष नवरदेव, नाबालिक १४ वर्षीय नवरी मुलगी तसेच त्यांचे ५ ते ६ लोकांना ताब्यात घेऊन कापूरबावडी पोलिस ठाण्यात दाखल केले असता बालविवाह कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे,गुन्हा दाखल केल्यानंतर पत्रकार प्रशांत मोटे यांना त्यांच्या उत्तम सामाजिक कार्यासाठी कापूरबावडी पोलिसांकडून शाबासकीची व कौतुकाची थाप दिली व असेच सामाजिक कार्य करण्याच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या,तसेच पत्रकार प्रशांत मोटे यांनी सुद्धा कापूरबावडी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे