राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मुख्य प्रवाहातली माध्यमं फारशी प्रसिद्धी देत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार आहे आणि ती योग्य आहे.निखिल वागळे(वरिष्ट पत्रकार)
अमित जाधव-संपादक
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मुख्य प्रवाहातली माध्यमं फारशी प्रसिद्धी देत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार आहे आणि ती योग्य आहे.निखिल वागळे(वरिष्ट पत्रकार)
दक्षिण भारतातल्या पाच राज्यातून दीड हजाराहून अधिक प्रवास करुन आलेल्या या यात्रेचं महत्व तथाकथित राष्ट्रीय माध्यमांना कळत नाही अशातला प्रकार नाही. पण बहुसंख्य माध्यमं सत्ताधारी भाजपने दिलेल्या करोडो रुपयांच्या जाहिरातीच्या दबावाखाली आहेत. कॅांग्रेसने पैशाला पैशाने उत्तर दिलं असतं तर कदाचित हे चित्र बदललं असतं, पण आपल्याकडे साधनसामुग्रीचा तुटवडा आहे असं कॅांग्रेस नेते सांगत आहेत.
याचं ताजं उदाहरण देगलूला बघायला मिळालं. प्रजावाणी वगैरे स्थानिक वृत्तपत्रांनी राहुल यांच्या यात्रेचे मथळे बनवले, पण या भागातलं सर्वाधिक खपाचं वृत्तपत्र असलेल्या लोकमतने पान ३ वर या यात्रेला स्थान दिलं. त्यादिवशी आर्थिक आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल ही महत्वाची बातमी होती हे खरं, पण दोन्ही बातम्यांना पहिल्या पानावर स्थान देणं अशक्य नव्हतं. लोकमतचे मालक दोनदा कॅांग्रेसचे खासदार असून ही परिस्थिती असेल तर इतर माध्यमांनी धंदा पाहिला तर नवल नाही.
टीव्ही चॅनल्स आणि वेबमध्येही कमीअधिक फरकाने हीच परिस्थिती आहे.
यावर उपाय एकच. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर. हा वापर भाजपने याआधी केला आहे. यावेळी कॅांग्रेसचा सोशल मिडियाही अत्यंत कार्यक्षमतेने चालवला जात आहे. भारत जोडोचं फेसबुक पेज, इन्स्टाग्राम अकाऊंट, ट्विटर हॅंडल आणि वेबसाईट यावरुन भारत जोडोचं प्रक्षेपण प्रभावीपणे केलं जात आहे. राहुल गांधींची पदयात्रा रोज लाईव दाखवली जातेय. इतर पैलूंवर प्रकाश टाकणारे विडिओही इथे आहेत.
भारत जोडो यात्रेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी हे सोशल मिडिया प्लॅटफॅार्मस तुम्ही पाहू शकता. याशिवाय, वायर, स्क्रोल, बीबीसी, मुंबई तक यावर या यात्रेचं विश्लेषणही मिळू शकतं.
तेव्हा, गोदी मिडिया को मारो गोली! सोशल मिडिया आता खेड्यापाड्यात पोचलाय. याचा ताजा अनुभव मला काल नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळाला. मुंबई तकसाठी मी केलेलं विश्लेषण काल रात्रीच इथे पोहोचलं होतं. आता जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी टीव्ही स्क्रीन नाही तर फक्त मोबाईल स्क्रीनची गरज आहे.
…आणि मोबाईल तर घराघरात पोहोचला आहे!
—————————
राहुल यांचं फेसबुक पेज. ५८ लाख फॅालोअर्स.