ब्रेकिंग
मुंब्रा रेल्वे स्टेशन ब्रिज येथे झालेल्या खुणाची उकलं, मुंब्रा पोलिसांनी केल दोन तासाच्या आत आरोपीला केल अटक..
अमित जाधव - संपादक

दिनांक 11/072025 रोजी मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत मुंब्रा रेल्वे स्टेशन ब्रिजखाली तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या दोन परिवाराध्ये अंथरून पांघरून स्वयंपाकाची भांडी कोणीतरी फेकली या कारणांवरून भांडण होऊन झालेल्या मारामारी मध्ये सचिन पुजारी नावाच्या व्यक्तीस जीवेठार मारण्याचे उद्देशाने जबर दुखापत करून जखमी केले. नमूद व्यक्तीस उपचारकामी छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा येथे ऍडमिट केले असता, सचिन पुजारी हे उपचारादरम्यान मयत झाले. झालेल्या घटनेबाबत मयत याची पत्नी सविता पुजारी यांनी पोलीस ठाण्यात खबर दिल्याने *मुंब्रा पोस्टे गु र. न 1209/2025 भा. न्या. सं. 103, 3(5)* प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. वपोनि यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सपोनि / विनायक माने व इतर पथक असे घटनास्थळ ठिकाणी भेट देऊन सी. सी. टी. व्ही. फुटेज व गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीत राहुल शिंदे,सीताराम जाधव यांचा कुठलाही पुरावा, धागा दोरा नसताना शोध घेऊन दोन तासाच्या आत आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि / कोरडे करीत आहे.अनिल शिंदे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंब्रा यांनी कळविले आहे