Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंब्रा आणि वागले इस्टेट भागात नगरसेवक संख्या वाढली मात्र विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दिव्यावर अन्याय झाला- रोहिदास मुंडे

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

*मुंब्रा आणि वागले इस्टेट भागात नगरसेवक संख्या वाढली मात्र विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दिव्यावर अन्याय झाला- रोहिदास मुडे

दिवा:-पालकमंत्री व गृहनिर्माण मंत्री यांच्या वागले इस्टेट आणि मुंब्रा भागा मध्ये नगरसेवक संख्या वाढते मात्र लोकसंख्या झपाट्याने वाढणाऱ्या व विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दिव्यात नगरसेवक संख्या वाढत नाही हा कोणता न्याय असा सवाल भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
दिव्याची लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यावेळी नगरसेवक संख्या वाढणे अपेक्षित असताना उलट नव्या प्रभाग रचनेत एक नगरसेवक कमी झाला आहे.प्रभाग रचनेत दिव्यावर अन्याय झाला आहे असे मत भाजपचे रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
नुकतीच पालिका निवडणुकीची नवी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दिवा शहरातील नगरसेवक संख्या 8 वरून 7 वर आली आहे.दिव्यातील काही भाग हा डायघर शीळ भागात जोडला गेला आहे.हा प्रकार म्हणजे दिवावासीयांवर अन्याय आहे असे मत मुंडे यांनी व्यक्त केले आहे. दिव्यात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसंख्या प्रमाणात नगरसेवक संख्या वाढायला हवी होती मात्र मुंब्रा आणि वागळे इस्टेट ईथे नगरसेवक संख्या वाढवली जाते आणि दिव्यावर अन्याय केला जातो हा कोणता न्याय असा सवाल रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे