ती खरचं वेश्या आहे ?
समाजात असे काही घटक असतात ज्यांच्या बद्दल कुणी लिहिणं तर सोडा साधं बोलत देखील नाही त्यातीलच एक घटक म्हणजे वेश्या.
रंगीबेरंगी भरगच हातात बांगडया, चमकदार साडी, केसात गजरा,तोंडात विडा आणि एक हात कंबरेवर ठेऊन स्वतःच्या पोरांच्या पोटाची खळगी रिकामी असल्याने ती भरून काढण्यासाठी १००-२०० रु. घेऊन केलेली देहविक्री. हे सर्वसाधारणपणे एका वेश्येचे चित्र.
आता या “स्त्री” बद्दल ती खरचं वेश्या आहे का ? हा प्रश्न पडतो . त्यामागची कारण म्हणजे पहिलं असं कि वेश्या एक स्त्री असते आणि घरदार, मुलंबाळं, संसारातील रांधा-वाढा- उष्टी-काढा हे देखील तिला करावंच लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे समाजाच्या कातिल किंवा हवस असणाऱ्या नजरेसमोर जरी ती वेश्या असली तरी सर्वसामान्य लोकांसारखं आयुष्य जगत असताना ती देखील एक “बाईमाणूस” असते. तिसरे कारण म्हणजे जर मी जॉबसाठी गेले तर तिकडे देखील मला अशीच वागणूक मिळणार असेल तर गपचूप धंदा करण्यापेक्षा स्वतंत्र राहून पोट भरण्यासाठी केलेला व्यवहार केव्हाही चांगला असं तिच्याशी बोलल्यावर कळतं. चौथं कारण म्हणजे आजच्या टेक्नोसॅव्ही युगात देखील तुम्हाला रोज पेपर मधून किंचाळून बलात्कार सांगणाऱ्या घटना वाचायला मिळतात पण एवढं लक्षात ठेव कि आमच्या सेवेमुळे बऱ्यापैकी तरी बलात्कार कमी होतात .लोक आमच्याकडे येतात आणि कितीही व्यवहार केला तरी तो देखील समाजमान्य बलात्कारचं असतो. पाचवं कारण म्हणजे शरीराला जखमा करून, २४ तास वेदना सहन करून,चारचौघात ती एक वेश्या आहे असं जगणं कुणाला आवडेल ? मजबूरी असते बाकी काही नाही रे .
आता मला सांगा खरचं ती “वेश्या” आहे ?
©शुभम शंकर पेडामकर
फोटो सौजन्य:- महाजाल