प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत गेल्या ७० वर्षापासून वंचीत असणाऱ्या कित्येक वर्ष पाण्यासाठी वणवण भटकनाऱ्या आदिवासीं लोकांस पाण्याची गंगा दारात आणून देणाऱ्या माननीय राजेश भांगे सर यांचा सत्कार करून गोरगरीब महिलांना साडी वाटप करून संक्रांतीचा सण साजरा…..
अमित जाधव-संपादक
*प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत गेल्या ७० वर्षापासून वंचीत असणाऱ्या कित्येक वर्ष पाण्यासाठी वणवण भटकनाऱ्या आदिवासीं लोकांस पाण्याची गंगा दारात आणून देणाऱ्या माननीय राजेश भांगे सर यांचा सत्कार करून गोरगरीब महिलांना साडी वाटप करून संक्रांतीचा सण साजरा.*
प्रेरणा फाउंडेशन ठाणे महाराष्ट्र राज्य रजि. 564/एफ 38784/बदलापूर/ठाणे /महाराष्ट्र. प्रेरणा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने सराई वाडी मुरबाड दि. 15/1/2022 शनिवार रोजी दुपारी 11 ते 4 वाजता हळदी कुंकू व साडी वाटपाचा कार्यक्रम आणि लोकमत पत्रकार श्री. राजेश भांगे यांनी पाण्याची सोय केली, उदघाटन प्रेरणा फाउंडेशन अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा ) गांवकर व कमिटी आणि मा. श्री. राजेश भांगे सर यांच्या हस्ते करण्यात आला.
लोकमत पत्रकार श्री. राजेश भांगे सर पाण्याची सोय कार्यक्रम आयोजन यांनी केले. व हळदी कुंकू व साडी वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा)गांवकर यांनी केले. खरंतर या आदिवासी ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रम प्रेरणा फाउंडेशन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेऊन आदिवासी लोकांना लाईट, पाणी, रस्ता या बरोबर आदिवासी लोकांच्या समस्या पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रेरणा फाउंडेशन करत असते आणि करत राहणार. आज संक्रांती निमित्त महिलांना साडी वाटप करून हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला. श्री. राजेश भांगे सर यांचे सामाजिक आणि पत्रकार कार्य पाहून त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. प्रेरणा फाउंडेशन अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा) गांवकर व कमिटी चा सत्कार करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमासाठी सचिव वैभव कुलकर्णी , व्यवस्थापक सौ. वैशाली चांदेकर,उपसचिव,दीलेश देसाई, खजिंनदार दिव्या गावकर, सभासद रोहन गावकर, सौ. भक्ती काळे यांनी मोलाचं सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमास श्री मां संजीव सुरेशचंद्र जैन,राजेश मोरे यांनी मदत केली मोलचे सहकार्य लाभल. या कार्यक्रमा ला पत्रकार बाळा दळवी, आदिवासी क्रांती सेना अध्यक्ष दिनेश जाधव तसेच श्री.केशव गडगे व मिसेस गडगे उपस्थित होते.तेथील गंभीर रस्ता परिस्तिथी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कडे मागणी केली आहे नाहीतर प्रेरणा फाउंडेशन रस्ता रोको आंदोलन करणार आहे.तसेच तेथील सर्व रास्ता दुर्गम असल्यामुळे तेथील आदिवासी लोकांना आपले प्राण हि गमवावे लागले आहे. त्यामध्ये गरोदर महिला, लहान मुले, आजी-आजोबा यांचा समावेश आहे. प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका दिप्ती (प्रेरणा) गावकर यांनी या समस्या जाणून घेऊन त्यांचा रस्ता लवकरात लवकर करणार सांगितले.बऱ्याच लोकांच्या जीवनातील समस्या सोडवण्यातही मुलाखत घेऊन त्याची यादी बनवली नंतर मुलांना मिठाई खाऊ वाटून कार्यक्रमाची सांगता झाली. प्रेरणा फाउंडेशन गोरगरिबांसाठी नेहमीच तत्पर असेल. असे आश्वासन लोकमत पत्रकार श्री. राजेश भांगे सर दीप्ती ऊर्फ प्रेरणा गांवकर यांनी दिले.