ज्योतिताई राजकांत पाटील यांचा कौतुकास्पद उपक्रम,दिव्यातील गरजू नागरिकांसाठी 15 रुपयांत मायेची थाळी सुरू करणार- सौ.ज्योती राजकांत पाटील
अमित जाधव-संपादक
दिव्यातील गरजू नागरिकांसाठी 15 रुपयांत मायेची थाळी सुरू करणार- सौ.ज्योती राजकांत पाटील
तन्वी फौंडेशनच्या माध्यमातून राबविणार लोकहिताचा उपक्रम*
दिवा:- दिव्यातील गरजू कामगार वर्गासाठी तनवी फाउंडेशन च्या माध्यमातून एक वेळचे जेवण केवळ पंधरा रुपयात मायेची थाळी म्हणून उपलब्ध करून देण्याचा निर्णय तनवी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ ज्योती राजकांत पाटील यांनी घेतला असून हा उपक्रम लवकरच बि आर नगर भागात सुरू केला जाणार आहे.
दिवा शहरात अनेक गरजू कामगार वर्ग वास्तव्यास आहेत. कोरोनाची परस्थिती व आर्थिक अडचण यामुळे कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये या भावनेतून केवळ पंधरा रुपये दराने गरजू लोकांना जेवणाची थाळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय तन्वी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ ज्योती पाटील यांनी घेतला आहे. बिगारी कामगार,नाका कामगार त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक यांना या योजनेचा लाभ होणार असून दररोज एक वेळचं जेवण केवळ 15 रुपयांत तन्वी फौंडेशनच्या माध्यमातून दिले जाणार आहे असे यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.


