Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कळवा खारीगाव पुलावर दुचाकी चा अपघात,दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

खारेगाव पुलावर शनिवारी रात्री नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीला भरधाव वाहनाने मागून धडक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत दुचाकीवर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

मुझामिल्ला बराकतुल्ला शेख (२५) आणि नवशाद आलम निजामुद्दीन अन्सारी (२५) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही मुंबईतील गोवंडी भागात राहतात. शनिवारी रात्री दोघेही दुचाकीवरून नाशिकहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांची दुचाकी खारेगाव पुलावर येताच मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मुझामिल्ला आणि नवशाद यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे