Breaking
ब्रेकिंग

रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे शिळफाटा ते कल्याण रस्ता पाच दिवस राहणार बंद ..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे – कल्याण,अंबरनाथ आणि बदलापूरमधील सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.कल्याण शीळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळील निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी ५ फेब्रुवारी रात्री १२ ते १० फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत या पाच दिवसांच्या कालावधीत पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे शिळफाटा ते कल्याण रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबईहून डोंबिवलीला जाणाऱ्या आणि शिळफाटा मार्गे मुंबईला जाणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलण्यात आला आहे. ५ फेब्रुवारी रात्री १२ ते १० फेब्रुवारी रात्री १२ पर्यंतच्या कालावधीत पलावा जंक्शनकडे येणारी हलकी, मध्यम वाहनांची वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे. अवजड वाहनांना हा रस्ता बंद असणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, असे म्हटले जाते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे