Breaking
ब्रेकिंग

मेष्टा चे प्रमुख संस्थापक मा.संजय तायडे  व कोकण विभाग अध्यक्ष मा.नरेश पवार यांनी शिष्टमंडळासह घेतली  शिक्षण मंत्र्यांची भेट अखेर शालेय शिक्षण त्रुटीपात्र शाळेना न्याय मिळाला …

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

मेष्टा च्या प्रमुख संस्थापक मा.संजय तायडे  व मा.नरेश पवार यांनी शिष्टमंडळासह घेतली  शिक्षण मंत्र्यांची भेट

अखेर शालेय शिक्षण त्रुटीपात्र शाळेना न्याय मिळाला  

मेष्टा च्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे संवेदनशील  शिक्षणमंत्री मा. ना. दीपकजी केसरकर यांची भेट घेत महोदयांना १७ नोव्हेंबर २०२२ रोजी शालेय शिक्षण विभागाच्या प्रसारित करण्यात आलेल्या प्रेसनोट संदर्भात अवगत केले आहे.
सदरील प्रेसनोटमध्ये सर्वांना न्याय दिला आहे परंतू १२,१५ व २४ फेब्रुवारी २०२१ या शासननिर्णयातील त्रुटीपात्र शाळांना योग्य न्याय मिळाला नसल्याची खंत राज्यभरातील त्रुटीपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. याबाबत रामटेक या शासकीय निवासस्थानी तासभर सविस्तर चर्चा केली. सदर शाळांवर झालेल्या अन्यायासंदर्भात मुद्देसूद मांडणी करत   सदर त्रुटीपात्र शाळांची भुमिका विषद करून पटवून देण्यात आली. या भुमिकेचे गांभीर्य लक्षात घेत मा. मंत्रीमहोदयांनी संबधित अधिकारी यांना त्या प्रमाणे निर्देश दिले.
या प्रसंगी  शालेय शिक्षण विभागाचे मा.सचिव रणजीतसिंहजी देओल यांच्या समवेत सर्व सन्माननीय अधिकारी उपस्थित होते.
करीता उद्याचा शासन निर्णय त्रुटींच्या पुर्तता केलेल्या शाळांसाठी सकारात्मक असेल अशी आशा आहे.सदरील बैठक मेस्टाचे संस्थापक  अध्यक्ष मा. डाॅ. संजयराव  तायडे पाटील , मेस्टा कोकण विभाग अध्यक्ष मेस्टा ठाणे  जिल्हा अध्यक्ष मा.नरेशजी पवार, प्रा. प्रदीपजी सावंत ,के.पी.पाटील यांच्या पुढाकाराने बैठक घेऊन निर्णयक चर्चा झाली व त्रुटी पात्र अनेक शाळेना न्याय मिळाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे