सावधान ; मुंबईत रहिवाशी इमारतींजवळ बिनधास्त फिरतोय बिबटया….
अमित जाधव--संपादक
*⭕️सावधान ; मुंबईत रहिवाशी इमारतींजवळ बिनधास्त फिरतोय बिबटया.*
मुंबई, ता 18 जाने ( संतोष पडवळ) : अनेक मुंबईकर लोक रात्रीच्या वेळी चालण्यासाठी किंवा कामासाठी बाहेर पडतात. पण आता काळजी घेण्याची गरज आहे. कारण मुंबईवर बिबट्याचा बिंदास वावर आहे. मुंबईतील गोकुळधाम परिसरात बिबट्या फिरताना दिसला आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबईतील परिसरात कॉलनीबाहेर बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. कॉलनीच्या गेटसमोर, इमारतीत आणि पार्किंगमध्येही बिबट्या दिसत होता. आतापर्यंत बिबट्याचे 3 व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये एक बिबट्या कॉलनीच्या गेटबाहेर चक्कर मारताना दिसत आहे. मग तो काही वेळ गेटबाहेर बसतो. एका व्हिडिओमध्ये तो एका इमारतीच्या गेटबाहेर उभा असल्याचे दिसत आहे. सुदैवाने इमारतीचे गेट बंद असल्याने बिबट्या इमारतीत घुसला. एका व्हिडिओमध्ये तो पार्क केलेल्या कारजवळ उभा आहे.
एका ट्विटर पोस्टनुसार, मुंबईतील गोरेगावच्या पूर्वेकडील गोकुलधाम परिसरात बिबट्या दिसला. वनविभागाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन म्हणाले की, परिसरातील लोकांनी घाबरण्याची गरज नाही. या परिसरात वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले


