ब्रेकिंग
दिवा शहरातील दूषित व दुर्गंधी युक्त येणाऱ्या पीण्याच्या पाण्या विषयी रहिवाशी आक्रमक.. दक्ष नागरिक नागेश पवार व रहिवाशीयांचे पालिका आयुक्ताना निवेदन..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट सह ईतर अनेक भागात मागील अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असून पाण्याला उग्र घाण वास येणे, पाण्याची चव घाण येणे इत्यादी समस्या जाणवत आहेत तसेच हे दूषित पाणी पिण्यामुळे लहान मुलांच्या तसेच वयोवृद्ध रुग्णांचीं डॉक्टर वारी वाढली आहे.
सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथे पुरवठा होत असलेल्या पिण्याच्या पाण्याचे प्रयोगशाळा चाचणी करण्यात यावेत व लवकरात लवकर स्वच्छ पिण्यायोग्य पाणी पुरवठा करून नागरिकांना दिलासा द्यावा असे म्हात्रे गेट रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते नागेश पवार यांनी ठाणे महापालिका आयुक्त यांना निवेदनद्वारे कळविले आहे यावेळी रहिवाशी सुशांत देसाई व आदी सहकारी उपस्थित होते
0
2
0
9
7
4



