सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे यांच्या निवासस्थानी श्रीसमर्थांच्या चरण पादुकांचा पूजन व दर्शन सोहळा उत्साहात संपन्न….
अमित जाधव-संपादक
सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे यांच्या निवासस्थानी श्रीसमर्थांच्या चरण पादुकांचा पूजन व दर्शन सोहळा उत्साहात संपन्न. ————————————————————–बदलापुर(गुरुनाथ तिरपणकर)-श्रीरामदासस्वामी संस्थान,सज्जनगड यांच्यावतीने राष्ट्रगुरु श्रीसमर्थ स्वामींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतुने बदलापुर शहरात दौरा सुरु आहे.त्याच अनुषंगाने येथील सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र नरसाळे रहाणार,गायंत्री संकुल,सानेवाडी,बदलापुर(प)येथील निवासस्थानी श्रीसमर्थ पादुका दर्शन व पूजन सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता.वांगणी येथील रामदासी सेवा आश्रमाचे संचालक परागबुवा रामदासी महाराज यांच्या पुढाकाराने पादुकांचे नरसाळे यांच्या निवासस्थानी आगमन झाले.श्री.राजेंद्र नरसाळे व सौ.कीर्ती नरसाळे उभयतांच्या हस्ते पादुकांची चौरंगावर स्थापना करुन मंगलमय वातावरणात व मंत्रघोषात चरणी पुष्पांजली अर्पण करून,विधीवत पुजा करण्यात आली.भाविकांनी दर्शन घेऊन यथाशक्ती शिधा व देणग्या दिल्या.याप्रसंगी सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला.या मंगलमय कार्यक्रमास दिलीप नारकर,सुवर्णा इस्वलकर,सुहास सावंत,विलास हंकारे,विलास साळगावकर,महेश सावंत,मंगेश सावंत,गुरुनाथ तिरपणकर हे सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच आस्था मांजरेकर,गवळी मॅडम, हेमा मतकर मॅडम,वैश्यवाणी समाजाचे विश्वस्त श्री.खडकबाण हे उपस्थित होते. या पूजन सोहळ्यास सुवर्णा इस्वलकर, सुहास सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी राजेंद्र नरसाळे यांचे नातेवाईक,मित्र,आप्तेष्ट,भाविकांनी मनोभावे पूजन व दर्शन घेतले.अशाप्रकारे पूजन व दर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला. शेवटी सर्व भाविकांच्यावतीने पादुकांच्या निर्गमनाची तयारी झाली,व समर्थांच्या पादुका इच्छीस्थळी रवाना झाल्या.