बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

कल्याण मेट्रोत बाधित शेतकऱ्यांना मोबदला व मेट्रोच्या कामाचा वेग वाढविण्याबाबत एम एम आर डी ए च्या अधिकाऱ्यांशी चर्चा..* *आमदार राजेश मोरे यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट..

अमित जाधव - संपादक

कल्याण-कल्याण तळोजा मेट्रो 12 मार्गाचे काम मागील जवळपास वर्षभरापासून सुरू आहे. या मेट्रो मार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जागा बाधित होत आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा,ज्याद्वारे कामाचा वेग वाढवता येऊ शकेल त्याचबरोबर या कामात काही अडथळे आहेत का आणि असल्यास ते कशाप्रकारे सोडवता येऊ शकतील , शिवाय ग्रामस्थांच्या जमिनी जात असताना तेथील गावपण कसे टिकवून ठेवता येईल आणि त्यांना सोयी सुविधा कश्या पुरवता येतील जेणेकरून तेथील ग्रामस्थ नाराज होणार नाहीत याबाबत आमदार राजेश मोरे यांनी अधिकाऱ्यांशी एम एम आर डी ए च्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली

दरम्यान शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत एम एम आर डी ए कडून सकारात्मकता दर्शवण्यात आल्याने मेट्रो दृष्टिक्षेपात आल्याचा विश्वास आमदार मोरे यांनी व्यक्त केला आहे
कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई वाहतूक सुकर व्हावी यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण तळोजा मेट्रो 12 प्रस्तावित करण्यात आली असून या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे खासदार डॉक्टर शिंदे यांच्याकडून मेट्रो मार्गाच्या कामाचा वारंवार आढावा घेतला जात असला तरीही कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे देखील सातत्याने या कामाबरोबरच कल्याण ग्रामीणच्या नागरिकांना कोणत्याही समस्या भेडसावू नये यासाठी पाठपुरावा करत आहेत कल्याण तळोजा मेट्रो चा मार्ग कल्याण ग्रामीण मतदारसंघातून जात असून बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी आमदार राजेश मोरे सातत्याने पाठपुरावा करत आहे आज आमदार मोरे यांनी उपाध्यक्ष अविनाश मुदगल , अतिरिक्त आयुक्त पद्माकर रोकडे , प्रकल्प अधिकारी बसवराज यांच्याशी चर्चा करत या कामात कमी अडचणी आहेत का याची माहिती घेतानाच शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला वेळेत देण्याच्या सूचना केल्या तसेच हे काम कमीत कमी कालावधी पूर्ण करून लोकांना मेट्रो सफरीचा मार्ग खुला करून देण्याची मागणी ही त्यांनी केली यावेळी त्यांचे सोबत डोंबिवली शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण आणि आमदार राजेश मोरे यांचे स्वीय सहाय्यक सतीश मोडक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे