डॉन दाऊद इब्राहिम ची प्रकृती खरच चिंताजनक का..?? काय म्हणाले प्रसिद्ध वकील उज्वल निकम
अमित जाधव - संपादक
दाऊद इब्राहिम…
दाऊदची (Dawood Ibrahim) प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. अशात 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला हाताळणारे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिलीये.
प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य
पाकिस्तानला जगापासून एखादी गोष्ट लपवायची असते, त्यावेळी पाकिस्तान सरकार संपूर्ण देशातील इंटरनेट सर्व्हिस बंद करतं, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय.
दाऊदवर विषप्रयोग झाल्याची बातमी फक्त सोशल मीडियावरून पसरलेली नाही, तर पाकिस्तानमधील न्यूज चॅनेल्सनेही हे वृत्त चालवलं आहे. याच वृत्ताला आधार म्हणजे संपूर्ण पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
पाकिस्तानी मीडियानेच या बातम्या चालवल्या आहेत की दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची मोठी पंचाईत झाली आहे. कारण आत्तापर्यंत पाकिस्तानने अधिकृतपणे, परवेझ मुशर्रफ यांच्यासह मोठ्या दर्पोक्तीने सांगितलं की, कोण दाऊद इब्राहिम ? आम्ही त्याला ओळखत नाही, असा दावा त्यांनी केला होता, असं निकम यांनी सांगितलंय.
दाऊद इब्राहिम हा मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील वाँटेड गुन्हेगार आहे. मी हा खटला चालवला तेव्हा, दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने कसा कट रचला, याचा प्रत्यक्ष पुरावा आम्ही न्यायालयात दिला होता. पण पाकिस्तानचं पितळ उघड पडू नये म्हणून त्यांनी दाऊदला लपवलं, असं निकम म्हणाले.