Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ऐन दिवाळीच्या तोंडावर ठाणे महापालिकेचा दिव्यातील त्या इमारतींवर हातोडा…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ऐन दिवाळीच्या तोंडावर ठाणे महापालिकेचा दिव्यातील त्या इमारतींवर हातोडा…..

ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात हायकोर्टाच्या आदेशानुसार गेले काही वर्षे चर्चेत असलेल्या त्या इमारतींवर अखेर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.सहा इमारती 143 सदनिका व 48 गाळे  प्रभाग समिती मार्फत निष्कसीत करण्यात आले असून काही दिवसांपूर्वीच स्टेशन परिसरात एक पंडाळ टाकून बाधित रहिवासीयांना पडले(डोंबवली) येथे जावे असे सांगण्यात आलं होतं राहिवाशियानी त्यास प्रतिसाद न देता अखेर कारवाई करावी लागली असे दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त अलका खैर यांनी सांगितलं.
बाधित रहिवासीयांच्या मागणी नुसार त्यांना दिव्यातच स्थलांतरित करणे असे सांगण्यात येत आहे.रहिवासीयांना मुलांच्या शिक्षणाच्या,इतर सुविधा पडले येथे नाहीत ,नियमित येण्याजाण्यासाठी वाहन नाहीत,अशा अनेक सुविधा आज तेथे उपलब्ध नाहीत त्यामुळे बाधित नागरिकांनी जाण्यास नकार दिला.दिवाळीच्या नंतर इमारतीवर कारवाई करावी असे काही नागरिकांनी देखील विनंती करून सुद्धा ठाणे महापालिकेने न जुमानता कारवाई चालूच ठेवले.अनेक महिलानी स्टेशन परिसरातील रस्त्यावर जोपुन जाहीर निषेध केला यामूळ दिवावासीयांमध्ये ठाणे महापालिकेच्या विरोधात प्रचंड संताप असून आम्हाला एन सणासुदीच्या काळात दिव्यातून हद्दपार करण्यात आले असे अश्रू गाळत महिलांनी स्पष्ट केलं.सदर कारवाई दरम्यान मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यानी उपस्थित राहून रस्त्याच्या मापंकणानुसारच इमारतीवर कारवाई करावी व नागरिकांना समान नेण्यासाठी वेळ देण्याचे सांगून कारवाईस थांबवण्यात यावी असे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले अनेक प्रयत्न करून तोडक कारवाई काही काळ थांबवण्यात आली.त्यामुळे नागरिकांना आता डोंबवली स्थित पडले येथे जाणे भाग पाडले..

काय म्हणाल्या दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त अलका खैर मॅडम…….लिंक वर जाऊन क्लिक करा

https://youtu.be/J7fe8gnn9II

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे