Breaking
ब्रेकिंग

राज्य घटना सार्वभौम आहे, वक्तव्याचा विपर्यास केल्यास त्यांच्यावरही आयोजकांसह प्रमुंखं यांच्यावरही गुन्हा दाखल करणार,त्याप्रमाणे नोटीस बजावण्यात येईल. श्री.सुनील कुऱ्हाडे(सहाय्यक पोलीस* *आयुक्त,डोंबिवली पोलीस प्रशासन विभाग

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

– संभाजी भिडे यांची १४ जाने.रोजी ब्राह्मण सभा,डोंबिवली(पू).येथे होणाऱ्या जाहीर व्याख्यान सभेला पुरोगामी संघटना पक्षांनी विरोध केला असता श्री.सुनील कुऱ्हाडे(सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस प्रशासन डोंबिवली विभाग) यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा विमाश करून बैठक घेतली.बैठकीत सांगताना श्री.सुनील कुऱ्हाडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की,’ही राज्यघटना सार्वभौम आहे,हे राज्य कायद्याचे आहे.इथे महापुरुष,संताबद्दल कोणी अपमानजनक बोलत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.मग तो कोणीही असो.संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल,संतांबद्दल,महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यास,तसेच अनिष्ट रुढी परंपरेला,अंधश्रध्देला थारा दिल्यास आयोजकांसह कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.कार्यकर्त्यांनी थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे.”या प्रसंगी श्रीमती.खापरे(प्रभारी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,रामनगर पोलीस स्टेशन),विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मोहन खंदारे सर हे ही उपस्थित होते.तसेच कार्यकर्त्यांमध्ये रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष (पँथर)आनंद नवसागरे,दामोदर काकडे(ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,आझाद समाज पार्टी),प्रशांत टेकुळे(महासचिव,डोंबिवली शहर वंचित बहुजन आघाडी), दिपक भालेराव(कबीर पेरियार मिशन,संस्थापक अध्यक्ष),सुभाष शिरसाट(रिपब्लिकन युवा सेना,कल्याण डोंबिवली शहर विधानसभा अध्यक्ष),अरुण शिरसाट(डोंबिवली शहर रिपब्लिकन युवा सेना अध्यक्ष),श्री.मेहता(डोंबिवली शहर अध्यक्ष,आझाद समाज पार्टी)सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे