महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लक्षद्विप मध्ये उभारणार – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले
अमित जाधव - संपादक
मुंबई दि.21- जगभरातील अनेक देशात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत.आपल्या भारत देशात सर्व राज्यांत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. लक्षद्विप या केंद्रशासीत प्रदेशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अद्याप एक ही पुतळा उभारण्यात आला नाही.त्यामुळे लक्षद्विप मध्ये येत्या ऑक्टोबर पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा उभारण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज येथे केली.
लक्षद्विपच्या मध्यवर्ती ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा अशी आपण मागणी केल्या नंतर लक्षद्विपचे प्रभारी प्रशासक प्रफुल्ल पटेल आणि जिल्हाधिकारी अर्जुन मोहन यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी प्रशासकिय मुख्यालय असणाऱ्या कवरती या मध्यवर्ती ठिकाणी जमीन देण्याचे मान्य केले.या ठिकाणि सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मिळवून येत्या ऑक्टोबर पर्यंत लक्षद्विप मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी आपण पुढाकार घेण्यात असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिले.कवरती हे गाव हे लक्षद्विपचे मुख्यालय आहे.येथे महात्मा गांधी यांचा पुतळा उभाण्यात आला आहे. लक्षद्विपला भेट दिल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी लक्षद्विप मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची सुचना ना.रामदास आठवले यांनी केली.त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याचे निश्चित करण्यात आले.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धिप्रमुख



