Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या उद्या प्रसिद्ध….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या उद्या प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांना ठाणे महापालिका प्रभागांच्या अंतिम मतदार याद्या www.thanecity.gov.in या वेबसाईटवर आणि निवडणूक विभाग आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली विधान सभा क्रमांक १४४ कल्याण ग्रामीण, १४६ ओवळा – माजिवडा, १४७ कोपरी पाचपाखाडी, १४८ ठाणे , १४९ मुंब्रा – कळवा या सर्व विधानसभा मतदार संघाच्या ठाणे महानगरपालिका हद्दीतील मतदार यादी प्रभाग निहाय विभागून ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. त्यावर नागरिकांकडून हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या. प्रारूप मतदार यादीवर प्रभानिहाय प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येत आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर आणि निवडणूक विभाग आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन ठेवण्यात येणार आहेत. तसेच मतदार याद्या महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र, तळमजला येथे आगाऊ मागणी नोंदविल्यास कार्यालयीन वेळेत विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे