ST कर्मचाऱ्याचं श्री शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन…
अमित जाधव-संपादक
ST कर्मचाऱ्याचं श्री शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन….
मुंबई, 8 एप्रिल : एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या सिल्वर ओक घराबाहेर संतप्त ST कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक सुद्धा केली आहे. या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली तसेच इतक्या मोठ्या राजकीय नेत्याच्या मुंबईतील घराबाहेर अशा प्रकारे आंदोलन होणं म्हणजे पोलीस, गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याचं बोललं जात आहे.
प्रसंगी या आंदोलनावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले, अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा हा प्रकार आहे. एसटी संपाच्या बाबतीत सरकरारने सर्व उपाययोजना आणि चर्चा केल्या. न्यायालयाचा निर्णय आहे तो. बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे पण तरीही कुठली तरी एक अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा आणि एका विशिष्ट गटाला चिथावणी देऊन माथी भडकवून अशा प्रकारचे कृत्य घडावे यासाठी सातत्याने हालचाली करत आहेत.