शीळ गाव परिसरातील मयत पीडित महिलेला न्याय मिळावा,दिव्यातील ठाकरे गटाच्या रणरागिणी आक्रमक.. ठाकरे गटाच्या योगिता नाईक यांचे डायघर पोलिसांना निवेदन..
अमित जाधव - संपादक
दिवा – शिवसेना(ठाकरे)पक्षाचे मा.आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मयत पीडित कै.अक्षता कुणाल म्हात्रे ह्या भगिनी च्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी शीळ-डायघर पोलीस ठाण्यामध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या विधानसभा संघटिका कल्याण ग्रामीण सौ योगिता हेमंत नाईक यांनी कल्याण शीळफाटा येथील एका मंदिरात एकांत शांतपणे बसुन तणाव कमी व्हावे म्हणून त्या मंदिरात गेल्या होत्या,अंधार पडल्याने त्यांनी मंदिरात आश्रय घेतले होते पण स्वतःला पुजारी म्हणवणारे त्या मानसिक स्थैर्य गमावलेल्या स्त्रीला आधार देण्या ऐवजी तिच्या चहात भांगेच्या गोळ्या मिसळून तिला बेशुद्ध केले व त्यानंतर तिच्या वर तीन तीन नराधमानी अतिप्रसंग केला,तिला शुद्ध आल्यावर तिने आरडाओरडा करण्याचे प्रयत्न केल्यामुळे त्या नराधम पुजाऱ्याने तिला जीवेठार मारण्यात आले आहे,देवाच्या दरबारी आश्रय घेणे ही त्या भगिनीची चूक होती? देवाच्या दरबारी सेवा देणार्या पूजार्यांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातचा चहा घेणे, काय ही त्या भगिनीची चूक होती? आणि देवाच्या दारी आलेली अभागी महिले कडे भोगवस्तू महणून पाहण्याचा अधिकार ह्या नराधमांना दिला कोणी? आणि मंदिराच्या पूजार्यांना असे कृत्य करताना माणसाची नव्हे किमान देवाची तरी भीती का नाही वाटली?
त्यांना जरी देवाची भीती वाटत नसली तरी त्यांना आता कायद्याची भीती जरूर वाटायला हवी,ते पुजारी म्हणून त्यांच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता कायद्याच्या माध्यमातून ह्या नराधमांना फाशी पेक्षा जर कठोर शिक्षा असेल तर ती मिळाली पाहिजे असे
डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मलिक यांची भेट घेऊन पोलिस ठाण्यात निवेदन देऊन कै. अक्षता म्हात्रे याना न्याय द्यावा व महिलांच्या सुरक्षा कडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली
त्यावेळी हेमंत नाईक,दिपक उतेकर, शरद मिंडे,शंकर राणे,सुवर्णा जाधव,संगीता उतेकर,सुमिता शिंदे,शर्वरी राणे, महिला आघाडी व पुरुष पदाधिकारी, उपस्थित होते.