बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ठाण्यात दिवसा ढवल्या तलवारीने वार करून ठार केलेल्या व्यवसायिक सतीश पाटील यांच्या हत्येचा पोलिसांनी 36 तासात केला उलगडा..

अमित जाधव - संपादक

ठाण्यात एका व्यावसायिकाची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. सतीश पाटील असे हत्या झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. ते वर्तकनगर येथील देवदयानगर परिसरात राहत होते. दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आलीये.सतीश पाटील हे ओवळा भागातील विहंग व्हॅली चौकात आले असताना, भूषण पाटील हा काही काम असल्याचं सांगून खाली उतरला. त्याचवेळी बाईकवरून दोनजण सतीश पाटील यांच्या कारजवळ आली. गाडीशेजारी पोहोचताच दोघांनीही तलवारीने सतीश पाटील यांच्यावर सपासप वार केले.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सतीश पाटील गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. गंभीर जखमी झाल्याने सतीश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. संशय येऊ नये म्हणून भूषण पाटीलने हल्लेखोरांकडून स्वत:च्या हातावर वार करून घेतले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

हत्या का केली कारण आल समोर..

भूषण पाटील हा कर सल्लागार आहे. सतीश पाटील यांच्याकडून त्याने दीड कोटी रुपये उसने घेतले होते. पैसे परत करण्याची वेळ आल्यावर भूषणचे मन बदलले. भूषणने नितीनला सोबत घेतले आणि त्याच्याशी चर्चा केली. यानंतर दोघांनी सुपारी घेऊन हत्या करणाऱ्यांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आलीये.पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असता त्यांना सतीश यांनी अनेकदा भूषण पाटील याच्याशी संभाषण केल्याचे समोर आलं. मात्र अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे असे स्पष्ट केलं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे