वंचितच्या उमेदवाराकडून मल्टीस्पेशालिटी रूग्णालय उभारण्याचा संकल्प,कल्याण ग्रामीण मधील अपुऱ्या आरोग्याच्या सुविधाबाबत इंगळे यांनी व्यक्त केली खंत..
अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता ४ नोव्हे – वंचितचे उमेदवार विकास इंगळे यांच्याकडून कल्याण ग्रामीणमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नागरिकांना त्यांनी याबाबतचा आश्वासन दिलं असून येणाऱ्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघात वंचित शोषित नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी त्यांनी वंचित बहुजन विकास आघाडीला मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन विकास इंगळे यांनी केल आहे.
कल्याण ग्रामीण मध्ये आतापर्यंत झालेल्या आमदारांनी येथील नागरिकांच्या आरोग्याकडं दुर्लक्ष केलेल आहे. या मतदारसंघात राहणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात वंचित, शोषित, मजूर वर्ग असून त्यांना आरोग्याच्या दृष्टीने सुविधा या मतदारसंघात उपलब्ध झालेल्या नाहीत. कल्याण ग्रामीण मधील जनतेला नेहमीच त्यांच्या आरोग्य सुविधासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागातील सरकारी हॉस्पिटल वर अवलंबून राहावे लागते. हे मागील काही वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेल्या प्रस्थापितांचे अपयश आहे. असा आरोप वंचितचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार विकास इंगळे यांनी केला आहे. विकास इंगळे यांनी नागरिकांच्या सुविधेसाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघात मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उभारणार असा संकल्प वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून केला असून निवडणुकीत मतदारांनी वंचितचा उमेदवार विजयी केल्यास नागरिकांच्या आरोग्यासाठी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असेही इंगळे यांनी स्पष्ट केले आहे.